टिळकनगर आगीप्रकरणी रिलायन्स रिअल्टर्सच्या भागीदारांविरोधात गुन्हा

टिळकनगर परिसरातील सरगम सोसायटीतील ११ माळ्यावर काही दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला.  या इमारतीतील रहिवाशांना २०१४ मध्ये फ्लॅटचा ताबा देण्यात आला होता. मात्र इमारतीची अग्निशमन यंत्रणा योग्यरीत्या काम करत नव्हती. तसंच नियमानुसार १५ माळ्यावरील रिफ्युजी परिसरामध्ये भिंत घालून बी व सी विंग यांना जोडणारा रस्ता बंद करण्यात आल्याचं निदर्शनास आलं अाहे.  नियमात केलेल्या उल्लघंनामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं टिळक नगर पोलिसांनी सांगितलं. 

रहिवाशांच्या तक्रारी

 आग लागलेली इमारत मे. रिलायन्स रिअल्टर्सचे भागिदार हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांना २००६ मध्ये पुनर्विकासासाठी दिली होती. टिळक नगर येथील सरगम सोसायटीला ओसी मिळाली नसल्याचं माहिती असताना विकासकानं २०१४ मध्ये रहिवाशांना इमारतीत राहण्यासाठी परवानगी दिली.  तसंच नियमानुसार १५ माळ्यावरील रिफ्युजी परिसरामध्ये भिंत घालून बी व सी विंग यांना जोडणारा रस्ता बंद करण्यात आला होता, असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. याबाबत इमारतीतील रहिवाशांनी वेळोवेळी तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. 

रिफ्युजी परिसर विकला

१५ मजल्यावरील ६६५ चौ. फुटांचा रिफ्युजी परिसर हा हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांनी १८ लाख रुपयांना विकला होता. ज्या व्यक्तीला या तिघांनी हा भाग विकला त्याला देखील त्याची कल्पना नसल्याचं चौकशीत पुढं आलं आहे.  त्यामुळेच सरगम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव विवेकानंद वायगंणकर यांच्या तक्रारीनंतर याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी हेमेंद्र मापारा, सुभक मापारा व कोठारी यांच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ), ३३६, ४२७ व ३४ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हेही वाचा - 

Exclusive : कुख्यात शस्त्र तस्कर दानिश अली मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न


पुढील बातमी
इतर बातम्या