मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

लक्ष्मणनं सोमवारी ४.३० च्या सुमारास मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवानं खाली लावलेल्या संरक्षक जाळीमध्ये तो अडकल्यानं त्याचा जीव वाचला.

मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

मंत्रालयात विषप्राशन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरणं ताज असतानाच पुन्हा एकदा मंत्रालयात एका तरूणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. लक्ष्मण चव्हाण असं या आत्महत्या करणाऱ्या तरूणाचं नाव असून तो प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता आहे. 


संरक्षक जाळीत अडकला

गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात किंवा आजूबाजूच्या परिसरात आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्यानं मंत्रालय प्रशासनं संरक्षक जाळी बसवली होती. लक्ष्मणनं सोमवारी ४.३० च्या सुमारास मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवानं खाली लावलेल्या संरक्षक जाळीमध्ये तो अडकल्यानं त्याचा जीव वाचला. 


तरूणाची चौकशी सुरू 

या घटनेमुळं मंत्रालय परिसरात काही वेळासाठी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत असून काही वेळापूर्वीच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीनं या तरूणाला खाली उतरवण्यात आलं आहे. सध्या या तरूणाची पोलिस चौकशी सुरू असून त्यांन आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. 



हेही वाचा - 

ठाण्यात मेडिकलच्या अभ्यासाच्या ताणामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा