ठाण्यात मेडिकलच्या अभ्यासाच्या ताणामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

एमबीबीएस असणाऱ्या शर्मिष्ठाला एमडी करायचे असल्याने वर्तवलीगेल्या काही दिवसांपासून ती ‘नीट’ परिक्षेचा अभ्यास करत होती. पण अभ्यास होत नसल्याने शमिष्ठा मानसिक तणावाखाली होती.

ठाण्यात मेडिकलच्या अभ्यासाच्या ताणामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या
SHARES

 मेडिकलच्या अभ्यासाच्या ताणामुळे शनिवारी सकाळी शर्मिष्ठा सुफल सोम (२७) या विद्यार्थिनीनं इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. एमबीबीएस असणाऱ्या शर्मिष्ठाला एमडी व्हायचं होतं. ‘नीट’च्या परिक्षेचा अभ्यास झाला नसल्याने शर्मिष्ठाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत अाहे.


स्वप्न अपूर्ण राहण्याची खंत 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिष्ठा ही प्रसिद्ध त्वचारोग तद्य डॉ कावेरी सोम यांची मुलगी आहे. ठाणाच्या कोलशेत एव्हरेस्ट सोसायटीतील ग्लोरी बिल्डीगमध्ये ते वास्तव्यास आहेत. एमबीबीएस असणाऱ्या शर्मिष्ठाला एमडी करायचे असल्याने वर्तवलीगेल्या काही दिवसांपासून ती ‘नीट’ परिक्षेचा अभ्यास करत होती. पण अभ्यास होत नसल्याने शमिष्ठा मानसिक तणावाखाली होती. या विषयावरून शर्मिष्ठाने शुक्रवारी रात्री आई - वडिलांशी चर्चा केली. त्यावेळी आई- वडिलांनी तिला समजावून सांगितलं. मात्र, एमडी होण्याचं स्वप्न अपूर्ण राहील याची खंत सातत्याने तिला वाटत असल्याने  शर्मिष्ठाने हे पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.


आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिली

शर्मिष्ठाने आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिली असून त्यात तिने आत्महत्येमागचे निश्चित कारण लिहिलं असल्याची शक्यता आहे. पोलिसांना ही चिट्ठी मिळाली असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा कापुरबावडी पोलीस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा - 

कुर्लात विवाहितेवर सामुहिक बलात्कार

चौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडा सुखरूप
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा