कुर्लात विवाहितेवर सामुहिक बलात्कार


कुर्लात विवाहितेवर सामुहिक बलात्कार
SHARES

कुर्ला येथे विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस अाली अाहे. या प्रकरणी दोघांना कुर्ला पोलिसांनी अटक केली अाहे. पिडीत महिलेच्या तोंडात मेफेड्रॉन (एमडी) हे ड्रग्ज जबरदस्तीने भरून हे कुकर्म केल्याचं उघडकीस अालं अाहे. 


एक आरोपी फरार

मुख्तार शेख (३९) व शाहिद खान उर्फ पप्पू (४८) अशी अारोपींची नावे अाहेत. तर एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ३० वर्षीय पिडीत महिला ३० डिसेंबरला महिला शौचालयात जात होती. यावेळी रस्त्यात तिला तिघांनी अडवलं. यावेळी तिच्या तोंडात आरोपींनी पांढऱ्या रंगाची पावडर कोंबली. त्यानंतर महिलेला गुंगी येऊ लागल्यानंतर अारोपींनी तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ३१ डिसेंबरला दोन आरोपींना अटक केली.



हेही वाचा - 

चौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडा सुखरूप

फ्लॅशबॅक २०१८: मुलींची तस्करी आणि वेश्याव्यवसाय




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा