चौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडा सुखरूप

गोवंडी पूर्वकडील गोपी कृष्ण इमारतीमधील चौथ्या मजल्यावर बारकाडे कुटुंब राहते. गुरुवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास अथर्वच्या आजीने कपडे वाळत घालून झाल्यावर घराची खिडकी उघडीच ठेवली होती. या खिडकीला ग्रिल नव्हत्या. यावेळी अथर्व खेळत खिडकीजवळ गेला.

SHARE

एखाद्या गंभीर अपघातातून अथवा आगीतून जर कोणी सुखरूप वाचला तर त्याला सगळे 'नशीब होतं म्हणून वाचला नायतर'…असं म्हणतात. अशीच काहीशी घटना गोवंडी येथे घडली. अथर्व बारकाडे हा १५ महिन्यांचा चिमुरडा चौथ्या मजल्यावरून खाली पडूनही वाचला अाहे. नशीब बलवत्तर म्हणून हा चिमुरडा सुखरूप अाहे. 


खेळत असताना पडला

गोवंडी पूर्वकडील गोपी कृष्ण इमारतीमधील चौथ्या मजल्यावर बारकाडे कुटुंब राहते. गुरुवारी सकाळी  ८.४५ वाजताच्या सुमारास अथर्वच्या आजीने कपडे वाळत घालून झाल्यावर घराची खिडकी उघडीच ठेवली होती. या खिडकीला ग्रिल नव्हत्या. यावेळी अथर्व खेळत खिडकीजवळ गेला. खिडकीतून खाली डोकावत असताना तोल जाऊन तो खाली पडला. अथर्व खाली पडल्याचे समजताच घरात एकच खळबळ उडाली. सर्व कुटुंब तातडीनं खाली गेले. यावेळी अथर्व जमिनीवर पडलेला दिसला. तो शुद्धीत होता.


झाडामुळे वाचला

खिडकीतून पडून अथर्व घराच्या शेजारी असलेल्या झाडाच्या फांदीवर पडला. त्यामुळे खाली कोसळण्याचा वेग कमी झाला आणि अथर्व जमिनीवर हळू पडला. या झाडाच्या फांदीमुळे अर्थवचा जीव वाचला. अथर्वला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतू, त्या रुग्णालयात आवश्यक सुविधा नसल्यानं त्याला मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अथर्वची प्रकृती स्थिर असून त्याच्या फक्त ओठ आणि पायाला मार लागल्याचं समजतं. हेही वाचा-

फ्लॅशबॅक २०१८: मुलींची तस्करी आणि वेश्याव्यवसाय

फाॅरेनर्सना टार्गेट करणाऱ्या चोरांना बेड्या
संबंधित विषय
ताज्या बातम्या