फाॅरेनर्सना टार्गेट करणाऱ्या चोरांना बेड्या

परदेशी नागरिकांना मुंबईतले रस्ते आणि कायदे फारसे माहिती नसतात. शिवाय ते पोलिसांची मदत घेतातच असंही नाही. त्यामुळेच ही टोळी फक्त पश्चिम द्रूतगती मार्गावर परदेशी नागरिकांना टार्गेट करत होती.

फाॅरेनर्सना टार्गेट करणाऱ्या चोरांना बेड्या
SHARES

पश्चिम द्रूतगती मार्गावर एकट्या प्रवाशांंना हेरून त्यांचे मोबाइल, बॅग चोरी करणाऱ्या टोळीचा खेरवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आशिष मावदिया आणि मोहम्मद सलीम शेख अशी या २ आरोपींची नावे आहेत. या दोघांच्या चौकशीतून त्यांनी काही दिवसांत केलेल्या ६ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याजवळून पोलिसांनी २७ मोबाइल, काही परदेशी नागरिकांचे पासपोर्ट, सोनसाखळी आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे.


परदेशी नागरिक टार्गेट

परदेशी नागरिकांना मुंबईतले रस्ते आणि कायदे फारसे माहिती नसतात. शिवाय ते पोलिसांची मदत घेतातच असंही नाही. त्यामुळेच ही टोळी फक्त पश्चिम द्रूतगती मार्गावर परदेशी नागरिकांना टार्गेट करत होती. ५ दिवसांपूर्वीच या टोळीने रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेची बॅग हिसकावून पळ काढला. अशा प्रकारच्या गुन्ह्यात वाढ होत असल्यामुळे खेरवाडी पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशिषला वांद्रे इथून ताब्यात घेतलं. त्याच्या चौकशीतून मोहम्मदचं नाव पुढे आलं.


मौजमजेसाठी चोरी

अंमली पदार्थांचं सेवन करण्यासाठी आणि मौजमेजेसाठी हे दोघे त्यांच्या एका साथीदारांच्या मदतीने ही चोरी करत होते. विशेष म्हणजे ते पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेणार यांची खात्री असल्यामुळे चोरी केल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर हे दोघे त्याचे कपडे बदलायचे. न्यायालयाने या दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा-

इंडियन आयडाॅल फेम गायिकेला सायबर चोरट्यांचा हिसका

बिल्डर संजय अग्रवालची गोळी झाडून घेऊन आत्महत्या



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा