SHARE

चेंबूरच्या प्रसिद्ध संजोना विकासक कंपनीचे विकासक संजय अग्रवाल यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. अग्रवाल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ठ असून या प्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


कंपनी भागीदारीत

चेंबूरच्या सिद्धी काॅलनी परिसरात अग्रवाल हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. पूर्वी अग्रवाल हे न्यू केम इंडस्ट्रीत २० वर्ष कार्यरत होते. ही केमिकल कंपनी असून या कंपनीतील केमिकल उत्पादने मुंबईतल्या नामांकित कंपनीत देण्याची जबाबदारी अग्रवाल यांच्यावर होती. १९९९ मध्ये अग्रवाल यांनी संजोना ही विकासक कंपनी सुनिल गुप्ता यांच्यासोबत भागीदारीत सुरू केली. अग्रवाल यांची मुंबईत विविध ठिकाणी कामे सुरू होती.


आत्महत्येचं कारण अस्पष्ठ 

 गुरूवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घरात कुणी नसताना अग्रवाल यांनी त्यांच्या खासगी पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ठ असून अग्रवाल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेला आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा - 

बनावट कागदपत्रांद्वारे म्हाडाचं घर देणारे अटकेत

नशेसाठी पैसे न दिल्यामुळे माथेफिरुने पंतनगरमध्ये केली तरुणाची हत्या
संबंधित विषय
ताज्या बातम्या