नशेसाठी पैसे न दिल्यामुळे माथेफिरुने पंतनगरमध्ये केली तरुणाची हत्या

नशेखोर पैशांसाठी संदीपजवळ आग्रह करत होता. त्यावेळी कंटाळून संदीपने त्याला हटकलं. याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने माथेफिरूने संदीपला काही कळायच्या आत त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

नशेसाठी पैसे न दिल्यामुळे माथेफिरुने पंतनगरमध्ये केली तरुणाची हत्या
SHARES

दारूसाठी पैसे न दिल्यामुळे पंतनगरमध्ये एका माथेफिरूने २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. संदीप घाडगे असं या मृत तरुणाचं नाव आहे. या हत्येनंतर आरोपीने घटनास्थळाहून पळ काढला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


'अशी' घडली घटना

घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील रमाबाई काॅलनी ट्रान्झिट कॅम्पमध्ये संदीप राहतो. मंगळवारी रात्री संदीप नेहमीप्रमाणे जेवन झाल्यानंतर इमारतीखाली उभा होता. त्यावेळी त्याच्याजवळ आरोपी माथेफिरू आला. त्याने नशा करण्यासाठी संदीपजवळ पैशांची मागणी केली. परंतु आपल्याजवळ पैसे नसल्याचं संदीपने त्याला सांगितलं. तरीही नशेखोर पैशांसाठी संदीपजवळ आग्रह करत होता. त्यावेळी कंटाळून संदीपने त्याला हटकलं. याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने माथेफिरूने संदीपला काही कळायच्या आत त्याच्यावर चाकूने हल्ला केला.


संधी साधून पळ

भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संदीपला उपचारासाठी नेण्याकरीता इमारतीतील रहिवासी सरसावले. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने तिथून पळ काढला. संदीपला उपचारासाठी जवळील शासकिय रुग्णालयात नेलं असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॅाक्टरांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.हेही वाचा-

एटीएम मशीनला स्कीमर बसवून लुटणारे अटकेत

लाच घेतल्याप्रकरणी पालिका कर्मचाऱ्याला अटकसंबंधित विषय