लाच घेतल्याप्रकरणी पालिका कर्मचाऱ्याला अटक


लाच घेतल्याप्रकरणी पालिका कर्मचाऱ्याला अटक
SHARES

बृहन्मुंबई पालिकेच्या पी उत्तर या वॉर्डच्या कार्यालयात काम करणाऱ्या घनश्याम सोपान घोरपडे (४९) याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे. बांगडी कारखाना असलेल्या व्यावसायिकाकडे त्याने ६ हजार रुपयांची लाच मागितली होती. 


६ हजारांची मागणी

मालाड येथील लिबर्टी गार्डन येथील पालिकेच्या पी उत्तर वॉर्ड कार्यालयात घोरपडे हा लीगल डिपार्टमेंट विभागात नोटीस क्लार्क म्हणून काम करतो. घोरपडेने २६ डिसेंबरला बांगडी कारखानदारास भेटून तुमच्याविरुद्ध पार्ले कोर्टात केस झाली असून हे प्रकरण मिटविण्याकरिता लाचेची मागणी केली. त्यानुसार २९ डिसेंबरला पडताळणीदरम्यान तक्रारदार बांगडी कारखानदारास तुम्हाला योग्य वाटेल तेवढी रक्कम दोन तीन दिवसात घेऊन या असे त्याने सांगितले. तक्रारदाराने  घोरपडेविरोधात एसीबीकडे तक्रार केली. बुधवारी तक्रारदाराकडून ६ हजार रुपये लाच स्वीकारून त्यातील ३ हजार रुपये तक्रादारास घोरपडेने परत केले. यावेळी एसीबीने रंगेहाथ घोरपडेला ताब्यात घेतले.



हेही वाचा -

बनावट कागदपत्रे बनवून कर्ज उकळले; दोघांना अटक

राजभवनातील दुचाकी चोरीला, आरोपीला अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा