बनावट कागदपत्रे बनवून कर्ज उकळले; दोघांना अटक

डोंगरी परिसरात राहणारे व्यावसायिक मेहबूब अन्वर खान यांना काही दिवसांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्जाचे हप्ते भरण्यासंदर्भात नोटीस आली. कोणतेही कर्ज घेतले नसताना ही नोटीस कशी काय पाठवली याबाबत चौकशी करण्यासाठी मेहबूब हिंदुजा लेलँन्ड फायनान्स कंपनीच्या विक्रोळी येथील कार्यालयात गेले.

बनावट कागदपत्रे बनवून कर्ज उकळले; दोघांना अटक
SHARES

बनावट कागदत्रांच्या मदतीने नवीन महागड्या कार कर्जावर घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुसक्या डोंगरी पोलिसांनी अावळल्या अाहेत. अखिलेश गुप्ता आणि दिपक दांगट अशी आरोपींची नावं असून या टोळीतील तिसरा आरोपी धिरेंद्र सिंग याचा पोलिस शोध घेत आहेत.


हप्ते भरण्याची नोटीस

डोंगरी परिसरात राहणारे व्यावसायिक मेहबूब अन्वर खान यांना काही दिवसांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्जाचे हप्ते भरण्यासंदर्भात नोटीस आली. कोणतेही कर्ज घेतले नसताना ही नोटीस कशी काय पाठवली याबाबत चौकशी करण्यासाठी मेहबूब हिंदुजा लेलँन्ड फायनान्स कंपनीच्या विक्रोळी येथील कार्यालयात गेले. यावेळी त्यांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या मदतीने २०१२ पासून अनेकदा कर्ज घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. 


फोटो तिसऱ्याच व्यक्तीचा

कर्जासाठी जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांत मेहबुब यांच्या नावाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनिंग कार्डही बनवले होते. पत्ताही सारखाच होता. मात्र, फोटो तिसऱ्याच व्यक्तीचा होता. मेहबूब यांच्या नावाने नुकतंच ६ लाख रुपयांचं वाहन कर्ज घेण्यात अालं होतं. आपल्या नावाने होत असलेल्या फसवणुकीबाबत मेहबूब यांनी डोंगरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


अधिकाऱ्यांचाच सहभाग

पोलिस तपासात कंपनीचे अधिकारी अखिलेश गुप्ता आणि दिपक दांगट यांनीच ही फसवणूक केल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. या प्रकरणातील त्यांचा तिसरा आरोपी धिरेंद्र सिंग हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.



हेही वाचा - 

राजभवनातील दुचाकी चोरीला, आरोपीला अटक

ब्रँच मॅनेजरने बँकेलाच घातला ३ कोटींचा गंडा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा