राजभवनातील दुचाकी चोरीला, आरोपीला अटक

अतिमहत्वाचं आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील अशी ओळख असलेल्या राजभवन परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. राजभवनाशी संदर्भात असलेल्या प्रत्येक गोष्टी कटाक्षाने तपासल्या जातात. असं असताना देखील राजभवनातील संदेश वाहकासाठी वापरण्यात येणारी दुचाकी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली.

राजभवनातील दुचाकी चोरीला, आरोपीला अटक
SHARES

राजभवनात संदेश वाहकांसाठी देण्यात आलेली दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला माता रमाबाई मार्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. सनुजाकुमार रमेश पाढी (२६) असं या आरोपीचं नाव आहे. चोरलेली दुचाकी त्याने कुर्ला येथे विक्रीसाठी नेली होती. मात्र त्या दुचाकीची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

अतिमहत्वाचं आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील अशी ओळख असलेल्या राजभवन परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. राजभवनाशी संदर्भात असलेल्या प्रत्येक गोष्टी कटाक्षाने तपासल्या जातात. असं असताना देखील राजभवनातील संदेश वाहकासाठी वापरण्यात येणारी दुचाकी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली.


'अशी' गेली दुचाकी चोरीला

विविध शासकिय आणि अतिमहत्वाच्या ठिकाणी राजभवनातील पत्रे जलदगतीने पोहचण्यासाठी शासनाकडून राजभवनात संदेश वाहक म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश मोरे यांना दुचाकी देण्यात आली आहे. २१ डिसेंबर रोजी सुरेश ही दुचाकी सर्व्हिसिंगसाठी मॅकेनिक मोहम्मद वासिम शेख यांच्या वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड पिअर पेट्रोलपंपजवळील गॅरेजमध्ये घेऊन गेले होते. गाडी दुरूस्ती केल्यानंतर मोहम्मद यांनी दुचाकी २३ कोचीव स्ट्रीट, मधुबन बिल्डिंगजवळील फूटपाथजवळ उभी केली. मात्र घाईगडबडीत ते दुचाकीची चावी काढण्यास विसरले.


पोलिसांत तक्रार

दरम्यान दुपारी २.१५ वा. मिनिटांनी मोहम्मद हे गॅरेजमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना राजभवनाच्या वापरासाठी असलेली दुचाकी जागेवर दिसली नाही. गाडी चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानंतर मोहम्मद यांनी सुरेश यांना फोनकरून कळवलं. त्यानंतर सुरेश आणि मोहम्मद यांनी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली.


'अशी' केली अटक

दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही खंगाळून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीची ओळख पटवली. खबऱ्यांच्या मदतीने आरोपी सनुजाकुमार विनोबा भावे नगर कुर्ला इथं असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सनुजाकुमारला अटक केली. मूळचा ओडिसाचा रहिवाशी असलेला सनुजाकुमार हा कुर्ला परिसरातील हाॅटेलमध्ये वेटरचं काम करत असून पैशांची गरज असल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. सध्या सनुजाकुमार हा पोलिसांच्या कोठडीत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.



हेही वाचा-

ब्रँच मॅनेजरने बँकेलाच घातला ३ कोटींचा गंडा

पोलिस निरीक्षकाला २२ लाखांची लाच घेताना अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा