एटीएम मशीनला स्कीमर बसवून लुटणारे अटकेत

अंधेरी परिसरात मागील अनेक दिवसांपासून कार्ड क्लोनिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या दोघांविषयी पोलिसांना एका गुप्त माहितीदाराने माहिती दिली होती. त्यानुसार दोघांना सापळा रचून मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

एटीएम मशीनला स्कीमर बसवून लुटणारे अटकेत
SHARES

मुंबईतल्या एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएममधील मशीनला स्कीमर बसवून नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या जोडगोळीला गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. कृष्णालिंगम सेल्वराज (३१) व देवेन विवेकानंद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी बनावट कार्ड, मोबाइल, आधारकार्ड आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. 


सापळा रचून अटक

अंधेरी परिसरात मागील अनेक दिवसांपासून कार्ड क्लोनिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या दोघांविषयी पोलिसांना एका गुप्त माहितीदाराने माहिती दिली होती. त्यानुसार दोघांना सापळा रचून मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या दोघांच्या अंगझडतीत पाच मोबाइल, आधार कार्ड, अॅडाप्टर, स्कीमिंग मशीन आदी साहित्य सापडले. 


आरोपींवर अाधीही गुन्हा

चौकशीत आरोपींनी दोन ते तीन ठिकाणी एटीएम सेंटरवर स्कीमर बसवून त्याच्या सहाय्याने बनावट कार्ड बनवून पैसे काढल्याचं सांगितलं आहे. पोलिस या माहितीची पडताळणी करत आहेत. आरोपींविरोधात यापूर्वी अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांनी इतर ठिकाणीही स्कीमर बसवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याबाबत तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.



हेही वाचा - 

बनावट कागदपत्रे बनवून कर्ज उकळले; दोघांना अटक

राजभवनातील दुचाकी चोरीला, आरोपीला अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा