बनावट कागदपत्रांद्वारे म्हाडाचं घर देणारे अटकेत

मुंबईत बनावट कागदपत्रांच्या मदतीने म्हाडा, एसआरएमध्ये कमी किंमतीत कोट्यातून घर देण्याची नावाखाली एक टोळी फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखा ६ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक बनवून आधी आरोपींची फसवणूक करण्याची पद्धत समजून घेत त्यांना रंगेहाथ अटक केली.

बनावट कागदपत्रांद्वारे म्हाडाचं घर देणारे अटकेत
SHARES

मुंबईत नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या लाॅटरीत घर न लागलेल्या अपात्र अर्जदारांना गाठून त्यांची बनावट कागदपत्रांच्या मदतीने फसवणूक करणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अलअमीन खान व बिलाल शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत.


कोट्यातून घर

मुंबईत बनावट कागदपत्रांच्या मदतीने म्हाडा, एसआरएमध्ये कमी किंमतीत कोट्यातून घर देण्याची नावाखाली एक टोळी फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखा ६ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक बनवून आधी आरोपींची फसवणूक करण्याची पद्धत समजून घेत त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरोधात फसवणूक व बनावट कागदपत्र दाखल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कागदपत्रांचा साठा ताब्यात

२०११ पूर्वीच्या झोपड्यांना सशुल्क परवाने मिळतात. पण त्यानंतरच्या झोपड्यांना बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने ही टोळी पात्र असल्याचं दाखवून त्यांची फसवणूक करायची. या टोळीकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अनेकांचा बनावट कागदपत्रांचा साठा हस्तगत केला आहे. ज्या ज्या नागरिकांची या दोघांनी फसवणूक केली आहे. त्यांनी पुढे येऊन तक्रार देण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.



हेही वाचा-

नशेसाठी पैसे न दिल्यामुळे माथेफिरुने पंतनगरमध्ये केली तरुणाची हत्या

लाच घेतल्याप्रकरणी पालिका कर्मचाऱ्याला अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा