जुहू चौपाटीवर बुडालेल्या तरुणांचे मृतदेह सापडले

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • क्राइम

अंधेरीतील जूहू चौपाटीवर पोहण्यासाठी अालेल्या पाच जणांपैकी ४ जण समुद्रात बुडाले होते.  त्यांना शोधण्यासाठी पोलीस, नौदल आणि तटरक्षक दलानं सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. आता या चारही जणांचे मृतदेह सापडले असल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे.

एकाला वाचवलं होतं

मुंबईतील जूहू चौपाटीवर गुरुवारी ५ जूलैला पाच जण मजा-मस्ती करण्यासाठी आले होते. या पाच जणांपैकी चार जण समुद्रात बुडाले होते. फरदिन सौदागर (१७), सोहेल शकील खान (१७), फैसल शेख (१७), नाझीर गाझी (१७) अशी या तरुणांची नाव असून हे सर्वजण डी.एन.नगर, अंधेरी पश्चिम इथं राहणारे आहेत. त्यावेळी या पाच जणांपैकी वअंधेरीतील जूहू चौपाटीवर पोहण्यासाठी अालेल्या पाच जणांपैकी ४ जण समुद्रात बुडालेसीम खानला (२२) याला समुद्र किनाऱ्यावरील लाईफ गार्डनी वाचवलं होतं. मात्र, जोरदार लाटांमुळे बाकी चार जणांना लाईफ गार्डना वाचवता आलं नव्हतं.

नेव्हीच्या हेलिकॉप्टरने शोध

नेव्हीच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या चार जणांचा शोध घेण्यात आला होता. या शोधकार्यावेळी शुक्रवारी चार जणांपैकी तीन जणांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागले होते. मात्र, एकाचा मृतदेह सापडत नसल्यामुळे शुक्रवारी रात्रभर सर्च ऑपरेशन सुरु होतं. मात्र, रात्री दीड वाजेच्या सुमारास फैजल सिकंदर सय्यद याचा मृतदेह सापडल्यामुळे पोलीस, नौदल आणि तटरक्षक दलानं सर्च ऑपरेशन थांबवलं आहे.


हेही वाचा -

सिंचन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे

संजूबाबाविरोधात बोलल्यामुळं जीवे मारण्याची धमकी


 

पुढील बातमी
इतर बातम्या