जुहू चौपाटीवर ४ तरूणांचा बुडून मृत्यू

जूहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास हे ५ जण आपल्या इतर २ मित्रांसोबत जूहू चौपाटीवर पोहण्यासाठी आले होते. पोहत असताना ते समुद्रातील डेंजर झोनमध्ये गेले. अचानक आलेल्या लाटांच्या तडाख्यात सापडून हे पाचही जण बुडू लागले.

जुहू चौपाटीवर ४ तरूणांचा बुडून मृत्यू
SHARES

मुंबईतील जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी आलेले ५ पैकी ४ तरूण समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे.  फरदिन सौदागर (१७), सोहेल शकील खान (१७), फैसल शेख (१७), नजीर रफीक (१७)  अशी या तरुणांची नावं अाहेत. 


हे सर्वजण डी.एन. नगर, अंधेरी पश्चिम इथं राहणारे आहेत. नेव्हीच्या हेलिकाॅप्टरच्या मदतीने या चारही जणांचा रात्रभर शोध घेण्यात आला. त्यानंतर सकाळी एकाचा मृतदेह हाती लागला. या तरूणाचं नाव नजीर रफीक असल्याची माहिती मिळत आहे. उर्वरीत तरूणांचे मृतदेह शोधण्यासाठी अग्निशमन दल आणि कोस्ट गार्डचे जवान सर्च आॅपरेशन करत आहेत.


एकाला वाचवलं 

जूहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी संध्याकाळी  ५ वाजताच्या सुमारास हे  ५ जण आपल्या इतर २ मित्रांसोबत जूहू चौपाटीवर पोहण्यासाठी आले होते. पोहत असताना ते समुद्रातील डेंजर झोनमध्ये गेले. अचानक आलेल्या लाटांच्या तडाख्यात सापडून हे पाचही जण बुडू लागले. चौपाटीवर बसलेल्या २ मित्रांनी हे दृष्य पाहिल्यावर त्यांनी त्वरीत या प्रकाराची माहिती चौपाटीवर उपस्थित लाइफ गार्ड यांना दिली. त्यांनी तात्काळ समुद्रात उडी मारत पाच जणांपैकी वसीम सलीम खान (२२) याला वाचवलं. मात्र लाटांच्या जोरदार माऱ्यामुळे इतर चौघेजण लाइफ गार्डच्या हाती लागले नाही. 


सर्च आॅपरेशन सुरूच

त्यानंतर अग्निशमन दल आणि कोस्ट गार्डच्या मदतीने या तरूणांचा शोध घेण्यासाठी सर्च आॅपरेशन सुरू करण्यात आलं. खराब हवामान आणि लाटांच्या तडाख्यामुळे समुद्रात गेलेल्या बचाव पथकाच्या बोटीला परतावं लागल्यानंतर कोर्स्ट गार्डने चेतक हेलिकाॅप्टर आणि डाॅनियर प्लेनच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान एका तरूणांचा मृतदेह जवानांच्या हाती आला असून इतरांचा शोध सुरू आहे. 


हेही वाचा-

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींना धमकी देणारा गजाआड

बलात्कार प्रकरणात मिमोह चक्रवर्तीला होणार अटक?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा