भारताला झटका, मेहुल चोक्सीनं सोडलं भारतीय नागरिकत्व

पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा चुना लावून देश सोडून गेलेला आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचा मार्ग आणखी बिकट झाला आहे. कारण चोक्सीनं भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. चोक्सीनं भारतीय पासपोर्ट एंटीगुआ उच्च आयोगामध्ये जमा केला आहे

नीरज मोदीनंतर चोक्सीचे पलायन

भारतातून पळून गेलेल्या आरोपींना पुन्हा भारतात आणण्यासाठी त्यांचं प्रत्यार्पण केलं जातं. याच प्रत्यार्पणाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मेहूलनं स्वतःचं भारतीय नागरिकतत्व सोडलं आहे. २०१७ मध्ये मेहुल चोक्सीनं एंटीगुआचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. मुंबई पोलिसांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच चोक्सीला एंटीगुआचं नागरिकत्व मिळालं होतं

२२ फेब्रुवारीला पुढील सुनावणी

आपण नियमानुसार भारतीय नागरिकत्व सोडून एंटीगुआचे नागरिकतत्व स्वीकारत असल्याचं त्यानं उच्च आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नागरिकतत्व सोडण्यासाठी मेहुलनं १७७ अमेरिकन डाॅलरचा डीडी ही जमा केला आहे. त्यानं त्याचा पासपोर्ट ३३९६७३२ कन्सिल्ड बूकसोबत जमा केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  याबाबत एंटीगुआ इथल्या न्यायालयात २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

काय आहे घोटाळा?

देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक अशी ओळख असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत फेब्रुवारी २०१८ मध्ये ११, ३३० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला आणि एकच खळबळ उडाली. हा घोटाळा २०११ मध्ये झाल्याचं म्हटलं जात असलं, तर त्याला बाहेर यायला तब्बल ७ वर्षे का लागली, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. यात प्रामुख्याने हिरे व्यापारी नीरज मोदीचं आणि मेहुल चोक्सीचं नाव पुढं आलं

लेटर ऑफ अंडरटेकींग (एलओयू)च्या अंतर्गत हा सर्व व्यवहार सुरू होता. या अंतर्गत एका बँकेच्या गॅरेंटीवर दुसरी बँक खातेधारकांना रक्कम पुरवते. ‘पीएनबी’च्या ‘एलओयू’चा वापर करून युनियन बँक, बँक आफ इंडिया, अॅक्सिस बँक आणि इलाहाबाद बँकेकडून या दोघांनी मोठ्या रक्कमेची कर्ज उचलली. यात प्रामुख्यानं ज्वेलरी उद्योजक नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी, पत्नी अमी मोदी आणि आणि पार्टनर मेहूल चोकसी यांच्या खात्याचा समावेश आहे. या सर्वांच्या खात्याद्वारे परदेशात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आले. शिवाय नीरव मोदीच्या मध्यस्तीनं काही ठराविक खातेधारकांना ‘एलओयू’ मिळाल्याचं म्हटलं जात आहे.


हेही वाचा

धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत कोठडी

२०० हून अधिक नागरीकांची फसवणूक करणारे पोस्ट एजंट अटकेत


पुढील बातमी
इतर बातम्या