धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत कोठडी


धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत कोठडी
SHARES

फॅशनेबल वस्तुंच्या विक्रीच्या नावाखाली अवैधरित्या शस्त्रविक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याला २२ जानेवारीपर्यंत कल्याण न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार आधारवाडी कारागृहातून कल्याण गुन्हे शाखेने धनंजय कुलकर्णीचा ताबा घेतला असून आता पोलीस तपासात याप्रकरणी अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.


अवैध शस्त्रविक्री

धनंजय कुलकर्णी हा भाजपाचा डोंबिवली शहराचा उपाध्यक्ष असून तो तपस्या फॅशन हाऊसच्या नावाखाली अवैध शस्त्रविक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १६ जानेवारीला कल्याण गुन्हे शाखेने धनंजय कुलकर्णीच्या दुकानावर कारवाईत त्याला अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून चाकू, सुरे, तलवारी, बंदुका अशी १७० प्राणघातक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. धनंजय कुलकर्णीला अटक केल्याबरोबर कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलिस दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. शनिवारी पुन्हा धनंजय कुलकर्णीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे.



हेही वाचा -

जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर

फेसबुक फ्रेंडचं गिफ्ट शिक्षिकेला पडलं महागात



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा