फेसबुक फ्रेंडचं गिफ्ट शिक्षिकेला पडलं महागात

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे ना.म.जोशी परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेला चांगलंच महागात पडलं आहे.

फेसबुक फ्रेंडचं गिफ्ट शिक्षिकेला पडलं महागात
SHARES

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे ना.म.जोशी परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेला चांगलंच महागात पडलं आहे. फेसबुकवरून ओळख झालेल्या मित्राने या शिक्षिकेला गिफ्ट पाठवल्याचे सांगून विविध कारणांवरून पैसे मागत तब्बल ६८ हजारांना गंडवलं आहे. या प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


६७ हजारांचा गंडा

ना.म.जोशी मार्ग परिसरात कुटुंबियांसोबत राहणारी युगंधरा (नाव बदललेले आहे) ही वरळी येथील एका नामाकिंत शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करते. सप्टेंबर महिन्यात तिला तिच्या फेसबुक अकाऊंटवरील मेसेजरवर अरविंद कुमार नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्याची फ्रेड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर दोघेही मेसेंजर अॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. अरविंदने युगंधराला आपण अमेरिकन नेव्हीत कॅप्टन पदावर असल्याचं सांगितलं होतं. तसंच सध्या अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणेसोबत पोलंडला आला असल्याचंही सांगितलं. काही महिने दोघांमध्ये बोलणं सुरू असल्यानं अरविंदने पोलंडमधून युगंधराला एक गिफ्ट पाठवायचं असल्याचं सांगत तिचा मोबाइल नंबर मागितला. विश्वासापोटी युगंधराने ही तिचा मोबाइल नंबर अरविंदला दिला. त्यावेळी युगंधराच्या व्हाॅट्स अॅपवर अरविंदरने एक सोन्याच्या नेक्लेसचा फोटो पाठवला आणि हे गिफ्ट असल्याचं लिहिलं होतं. १२ आॅक्टोंबर रोजी युगंधराच्या फोनवर एक फोन आला. त्यावेळी समोरील महिलेने आपण दिल्लीच्या कस्टम आॅफीसमधूनबोलत असल्याचं सांगितलं. तुमचं पार्सल आलं असून त्यासाठी तुम्हाला ६८ हजार इतकी कस्टमड्युटी भरावी लागेल असंही या महिलेनं युगंधराला सांगण्यात आलं.


फसवणूक आली लक्षात

त्यावेळी युंगधराने तिच्या बॅकेतून त्या महिलेनं दिलेल्या अकाऊंटवर ६८ हजार ५०० रुपये पाठवले. पैस पाठवलेलं अकाऊन्ट हे झाकी उल्ला शरीफ या नावाच्या व्यक्तीचं होतं. पैसे पाठवल्याचं युगंधराने दिल्लीतील त्या महिलेस फोन करून सांगितलं. मात्र पुन्हा दुपारी ३ वाजता त्या महिलेचा फोन आला. त्यावेळी तिने त्या पार्सलमध्ये काही विदेशी चलान आढळून आलं असून तुम्हाला त्याचा दंड म्हणून २ लाख भरावे लागतील असं सांगितलं. दंड न भरल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते असं सांगत घाबरवलं. याबाबत युगंधराने अरविंदला फोन करून विचारलं असता त्याने देखील आपण तुला खर्चासाठी ३० हजार डाॅलर पाठवल्याचं सांगितलं. तो पर्यंत दिल्लीतील त्या महिलेनं पुन्हा कोटक महिंद्रा या बँकेच्या खात्यावर २ लाख रुपये भरण्यास सांगितलं. त्या महिलेवर संशय आल्यानं युगंधराने शुरजी वल्लभदास रोड, बलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई येथील कस्टम आॅफीसला भेट देऊन आपल्या नावावर कोणतं पार्सल आलं आहे का ? हे तपासलं. त्यावेळी मात्र आपली फसणवूक होत असल्याचं युंगधराच्या लक्षात आलं नि तिने थेट ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाणे गाठत अरविंदकुमार विरोधात तक्रार नोंदवली. १२ आॅक्टोबर २०१८ ला याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून १५ जानेवारी २०१९ ला पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने दिली आहे.



हेही वाचा -

इतक्या गाड्या चोरल्यात की, आठवत नाही त्या कुठे-कुठे उभ्या केल्यात!

डिटर्जंट कारखान्यात ड्रग्ज! ड्रग्ज तस्कर टोळीच्या म्होरक्याला अखेर पनवेलमधून अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा