डिटर्जंट कारखान्यात ड्रग्ज! ड्रग्ज तस्कर टोळीच्या म्होरक्याला अखेर पनवेलमधून अटक

नवी मुंबईतील रसायनी परिसरात तयार केल्या जाणाऱ्या ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अखेर पाच महिन्यांनंतर अटक करण्यात डीआरआयला यश आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव एच असथ ऊर्फ तंबी (४३ वर्षे) असं असून तो उच्चशिक्षित आहे.

डिटर्जंट कारखान्यात ड्रग्ज! ड्रग्ज तस्कर टोळीच्या म्होरक्याला अखेर पनवेलमधून अटक
SHARES

मुंबईत विविध मार्गावरून विक्रीसाठी येणाऱ्या अंमली पदार्थांवर रोख बसवण्यात गेल्या काही वर्षात महसुल गुप्तचर विभागा (डीआरआय) ला चांगल यश आलं आहे. डीआरआयच्या कडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांना मुंबईत छुप्या पद्धतीनं अंमली पदार्थ आणणं अवघड झालं आहे. त्यामुळे अंमली पदार्थ तस्करांनी नवी शक्कल शोधून काढली आहे. मुंबई शहरालगतच्या रिकाम्या गोदामातच कुठल्या तरी वस्तुचा कारखाना सुरू कारायचा. मग या कारखान्याच्या नावाखाली अंमली पदार्थ तयार करत, त्या वस्तुच्या नावाखाली अंमली पदार्थांची तस्करी करायची अशी ही शक्कल आहे.

अशीच शक्कल लढवत नवी मुंबईतील रसायनी परिसरात तयार केल्या जाणाऱ्या ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अखेर पाच महिन्यांनंतर अटक करण्यात डीआरआयला यश आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव एच असथ ऊर्फ तंबी (४३ वर्षे) असं असून तो उच्चशिक्षित आहे.


मलेशियात ड्रग्ज

पाच महिन्यांपूर्वी डीआरआयला मिळालेल्या माहितीनुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी रसायनी परिसरातील डिटर्जंट कारखान्यावर कारवाई करत हा कारखाना उद्धवस्त केला होता. तर या कारवाईदरम्यान मुंबईतील पुरवठा व्यवस्था पाहणाऱ्या उच्चशिक्षित जगदीश नावाच्या व्यक्तिला अटक केली होती. तर जगदीशबरोबरच वित्तव्यवस्था आणि वाहतूकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या साजू कासिम आणि एन. प्रकाश या दोघांनाही अटक केली होती.

अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीतून पुढे डीआरआयनं दिल्ली तामिळनाडूमध्ये कारवाई करत आणखी सात जणांच्या मुसक्या आवळल्या. तर या सर्वांच्या चौकशीतून मलेशियातील जॅक नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून एच असथ ऊर्फ तंबी ड्रग्जचा पुरवठा करत असल्याची महत्त्वाची बाब उघड झाली. तंबी हा फरिदाबाद इथं कार्यरत होता. तर एअर कार्गोच्या माध्यमातून मोठ्या शिताफीनं तंबीकडून ड्रग्ज मलेशियाला पाठवलं जात असल्यची माहिती डीआरआयमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे.


पार्श्वभूमी अशी

पाच महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईनुसार, या टोळीकडून मोठी शक्कल लावत नवी मुंबईतील रसायनी परिसरातील एका गोदामात केटामाईन आणि मेटाएम्फेटामाईन ड्रग्जची निर्मिती केली जायची. तर जिथं या ड्रग्जच्या निर्मिती केली जात होती तिथं डिटर्जंटचा कारखाना असल्याचं भासवलं जात होतं. तर डिटर्जंटच्या नावाखालीच ड्रग्जच्या निर्मितीसह तस्करीही केली जात असल्याचीही बाब यावेळी समोर आली आहे. तर आरोपीकडून ड्रग्जच्या तस्करीसाठी मलेशियन टोळीची मदत घेत मलेशियात अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचीही धक्कादायक बाब उघड झाली आहे. या कारवाईनंतरच्या तपासात अटक केलेल्यांकडून तंबीचं नाव पुढं आलं आणि त्यानुसार नुकतीच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तंबीला पनवेलमधून अटक केली आहे.


तस्करीची पद्धत

रसायनी परिसरातील गोदामात-कारखान्यात तयार करण्यात आलेले ड्रग्ज परदेशात पाठवण्यासाठी तंबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक डमी कंपन्या तयार केल्या होत्या. तर त्यासाठी त्यांनी आयत-निर्यात क्रमांक (आयईसी) ही घेतला होता. या क्रमांकाच्या सहाय्याने डिटर्जंट पावडरच्या नावाखाली ड्रग्जची मलेशियात निर्यात केली जात असल्याचं डीआरआयच्या कारवाईतून उघड झालं आहे. 

तंबीला मदत करणारी मलेशियातील टोळी ही भारतीय वंशाची असून त्यातील बहुसंख्य जण तामिळनाडूतील रहिवासी असल्याचंही समजतं आहे. ड्रग्जच्या निर्मितीसाठी जसं डिटर्जंट कारखान्याचा आधार हे तस्कर घेत होते तसंच तस्करीसाठी उच्चशिक्षित मुलांना हे आपल्या जाळ्यात ओढत त्यांचा वापर करत असल्याचंही समोर आलं आहे. डिटर्जंट कारखान्यात तयार केलं जाणार केटामाईन आणि मेटाएम्फेटामाईन ड्रग्ज चार किलोच्या रोलमध्ये भरायचे. त्यानंतर हे रोल ५० किलोच्या बॅगमध्ये लपवत ड्रग्जची परदेशात घेऊन जायचं अशी या टोळीची पद्धती होती.



मालिकेत काम देण्याच्या नावाखाली ८० जणांची फसवणूक, दोघे अटकेत

Exclusive : गँगस्टर गुरू साटम दक्षिण अफ्रिकेत, आर्थिक व्यवहार सांभाळणारा हस्तक अटकेत




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा