Coronavirus cases in Maharashtra: 312Mumbai: 151Pune: 35Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan-Dombivali: 9Thane: 9Navi Mumbai: 8Ahmednagar: 8Vasai-Virar: 6Yavatmal: 4Buldhana: 3Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Exclusive : गँगस्टर गुरू साटम दक्षिण अफ्रिकेत, आर्थिक व्यवहार सांभाळणारा हस्तक अटकेत

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा एकेकाळचा जवळचा सहकारी गुरु साटम हा गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा सक्रिय झाला होता. प्रभादेवीतील एका व्यावसायिकाकडून ६० लाखांची खंडणी वसूल केली. मात्र साटमकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्या व्यावसायिकाने मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

Exclusive : गँगस्टर गुरू साटम दक्षिण अफ्रिकेत, आर्थिक व्यवहार सांभाळणारा हस्तक अटकेत
SHARE

 मुंबईतून पळालेला आणि गेली ३० वर्षे विदेशातच असलेल्या गँगस्टर गुरू साटमच्या टोळीला मुंबई पोलिसांनी खिंडार पाडत त्याच्या महत्वाच्या साथीदाराला अटक केली आहे. कृष्णकुमार बाळकृष्ण नायर उर्फ केव्हिन नायर असं त्यांचं नाव आहे. भारतातून हाँगकाँगला वळवण्यात आलेले पैसे केव्हिन हवालामार्गे गुरू साठमपर्यंत पोहचवायचा. केव्हिनला केरळमधून पोलिसांनी अटक केली आहे. केव्हिनच्या अटकेनंतर गुरू साटमचे मुंबईसह आसपास परिसरातील सर्व ठिकाणं पोलिसांच्या रडारवर आली आहेत. केव्हिनच्या चौकशीतून गुरू सध्या दक्षिण अफ्रिकेत लपला असल्याचंही उघड झालं आहे. 


पाच साथीदारांना रंगेहाथ 

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा एकेकाळचा जवळचा सहकारी गुरु साटम हा गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा सक्रिय झाला होता. प्रभादेवीतील एका व्यावसायिकाकडून ६० लाखांची खंडणी वसूल केली. मात्र साटमकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्या व्यावसायिकाने मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी जुलै २०१८ मध्ये त्याच्या भारत सोलंकी अमोल विचारे, राजेश आंब्रे, बिपिन धोत्रे आणि दीपक लोधिया या पाच साथीदारांना रंगेहाथ अटक केली.  


हवालाद्वारे पैसे गुरूपर्यंत

या आरोपींच्या चौकशीतून खंडणी न दिल्यास साटमने त्या व्यावसायिकाला जिवे मारण्याची सुपारी दिल्याचं पुढं आलं होतं. त्यावेळी भारतातून बिपीन धोत्रे हा गुरूचे आर्थिक व्यवहार संभाळात असल्याचं पुढे आलं. बिपीनच्या चौकशीत तो खंडणीचे पैसे पुढे हाॅँगकाॅँगमध्ये कृष्णकुमार बाळकृष्ण नायर उर्फ केव्हिन नायरला द्यायचा. केव्हिन मग हवालाद्वारे ते पैसे गुरूपर्यंत पोहचवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर केव्हिन हा पोलिसांच्या रडारवर आला. 


हाँगकाँगमध्ये नाव बदललं

केव्हिन सध्या हाँगकाँगमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार केविनविरोधात पोलिसांनी एलओसी (लूक आऊट नोटीस) जारी केली. या पाच जणांच्या अटकेनंतर केव्हिनचे नाव त्यात आल्याची माहिती त्याला कळाल्यानंतर त्याने हाँगकाँगमध्ये स्वतःचं नाव बदलून बनावट पासपोर्ट बनवून घेत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेला सहा महिने उलटल्यानंतर वातावरण शांत झाले असल्याचा अंदाज बांधत केविनने भारतात येण्याचं ठरवलं. 


दुसऱ्या पासपोर्टवर

केव्हिन हाँगकाँगवरून निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर तो केरळच्या त्रिवेंद्रम विमानतळावर उतरणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी त्रिवेंद्रम विमानतळावरील सुरक्षा रक्षकांना सूचना दिली. केव्हिन दुसऱ्या पासपोर्टवर आल्यामुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणांना संशय आला नाही. मात्र पासपोर्ट क्रमांक सोडल्यास इतर सर्व माहिती ही मिळती जुळती असल्यामुळे त्याला ताब्यात घेतले. 


साटम रडारवर 

 मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केव्हिनला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली असून त्याच्याजवळ अधिक चौकशी सुरू आहे. त्याच्या अटकेनंतर गुरू साटमच्या ठावठिकाण्याची माहिती पोलिसांना मिळाली असून सध्या साटम हा पोलिसांच्या रडारवर आहे. हेही वाचा -  

Exclusive : कुख्यात शस्त्र तस्कर दानिश अली मुंबई पोलिसांच्या ताब्यात

पुस्तकातली कथा वाचून ब्रँच मॅनेजरने फसवणुकीचा कट रचला

सावधान ...मोबाइलवर येणारी अनोळखी लिंक खिशाला लावेल कात्री
संबंधित विषय
ताज्या बातम्या