सावधान ...मोबाइलवर येणारी अनोळखी लिंक खिशाला लावेल कात्री

काही क्षणात महिलेच्या मोबाइलवर एक लिंक आली. नेमकं काय आहे लिंकमध्ये हे पाहण्यासाठी त्यांनी लिंकवर क्लिक करत ती उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र लिंक ओपन झाली नाही. त्यानंतर काही क्षणात महिलेच्या खात्यातून पहिल्यांदा ४९ हजार, दुसऱ्यांदा ४९ आणि तिसऱ्या वेळी १८ हजार रुपये काढले गेले.

सावधान ...मोबाइलवर येणारी अनोळखी लिंक खिशाला लावेल कात्री
SHARES

अलिकडे इंटरनेट सर्फिंगही मोबाइलवरून करण्यास अनेक जण प्राधान्य देतात. त्यामुळेच मोबाइलवर अनेक लिंक येत असतात. उत्सुकतेपोटी अनेक जण त्या लिंक उघडून पाहतात. मात्र, या अनोळखी लिंक तुमच्या खिशाला कात्री लावून जाऊ शकतात. नुकतंच अशी अनोळखी लिंक उघडल्याने बोरिवलीतील एका महिला प्राचार्याच्या खात्यातून १ लाख १७  हजार रुपये काढले गेले आहेत. या प्रकरणी दिंडोशी पोलिस अधित तपास करत आहेत.


केवायसीचा बहाणा

बोरिवली पूर्व परिसरात राहणाऱ्या ६४ वर्षीय तक्रारदार या मालाडमधील एका महाविद्यालयात प्राचार्य आहेत. ४ जानेवारीला त्या महाविद्यालयात असताना त्यांना एक निनावी फोन आला. समोरील व्यक्तीने आपण बँकेतून बोलत असून बँक खात्याचे केवायसी भरायचे असल्याचे सांगत  बँक खात्यांबाबत माहिती विचारली. मात्र, अशा प्रकारे फसवणुकीच्या अनेक घटना कानावर अाल्या असल्याने महिलेने माहिती न देता आपण स्वत: बँकेत जाऊन माहिती देऊ असं त्या  व्यक्तीला सांगितलं. त्यावर त्या व्यक्तीनं सांगितलं की, बँकेत जाण्याचीही गरज नाही. तुमच्या मोबाइलवर एक लिंक पाठवत आहे. ती मोबाइलवर उघडल्यास तुम्हची माहिती आॅनलाईन पोच होईल.


नुसत्या क्लिकने पैसे गेले

काही क्षणात महिलेच्या मोबाइलवर एक लिंक आली. नेमकं काय आहे लिंकमध्ये हे पाहण्यासाठी त्यांनी लिंकवर क्लिक करत ती उघडण्याचा प्रयत्न  केला. मात्र लिंक ओपन झाली नाही. त्यानंतर काही क्षणात महिलेच्या खात्यातून पहिल्यांदा ४९ हजार, दुसऱ्यांदा ४९ आणि तिसऱ्या वेळी १८ हजार रुपये काढले गेले. मेसेज पाहताच महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. तिने आलेल्या फोनवर संपर्क साधला असता तो फोन बंद येत होता. बँकेशी संपर्क साधला असता त्यांची फसवणूक करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर महिलेने दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


पोलिसांचं आवाहन

  • अनोळखी ई मेल, मेसेज, साईड, लिंक उघडू नये.
  • सार्वजनिक ठिकाणी फ्री वायफायचा वापर टाळावा
  • सुरक्षित पासवर्ड वापरून वेळोवेळी तो बदलत रहावे.
  • कोणतेही अॅप डाऊनलोड करताना त्यावरील नियम व अटी काळजीपूर्वक वाचावे.
  • वनटाइम पासवर्ड सेवा सुरू ठेवा
  • परिचयाच्या वेबसाइटचाच पर्याय ठेवा



हेही वाचा - 

मालिकेत काम देण्याच्या नावाखाली ८० जणांची फसवणूक, दोघे अटकेत




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा