पुस्तकातली कथा वाचून ब्रँच मॅनेजरने फसवणुकीचा कट रचला

मुजावर हे लेखक रवि सुब्रमण्याम यांनी लिहिलेले बॅक स्टार हे पुस्तक वाचत होते. या पुस्तकात एका बँकेत झालेल्या एका आर्थिक घोटाळ्याची कथा दिली होती. एका व्यापाऱ्याने १० कामगाराच्या नावाने बनावट माहिती सादर करून क्रेडिट कार्ड मिळवत बँकेला लाखो रुपयांचा चुना लावला होता.

पुस्तकातली कथा वाचून ब्रँच मॅनेजरने फसवणुकीचा कट रचला
SHARES

बोगस क्रेडिट कार्डच्या मदतीने युनियन बँकेला कोट्यावधी रुपयांना गंडवणाऱ्या बँकेचाच ब्रँच मॅनेजर नदरूल मुजावरला शिवडी पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. नदरूल मुजावर याने बॅक स्टार या पुस्तकातील कथा वाचून ही फसवणूक केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. मुजावर सध्या पोलिस कस्टडीत असून त्याच्या चौकशीतून अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. 


पुस्तकं वाचण्याची आवड 

युनियन बँकेत चिफ मॅनेजर पदावर कार्यरत असलेले मुजावर याची २०१२ मध्ये युनियन बँकेच्या क्रेडिट कार्ड रिकव्हरी विभागात बदली झाली होती. बँकेतील अत्यंत हुशार अधिकाऱ्यांपैकी मुजावर हे एक होते. त्यामुळेच बँकेने रिकव्हरी विभागाची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती. मुजावर यांना चालू आर्थिक घडामोडी आणि बँकांसंदर्भात असलेली पुस्तकं वाचण्याची आवड होती. 


आर्थिक घोटाळ्याची कथा

२०१४ मध्ये मुजावर हे लेखक रवि सुब्रमण्याम यांनी लिहिलेले बॅक स्टार हे पुस्तक वाचत होते. या पुस्तकात एका बँकेत झालेल्या एका आर्थिक घोटाळ्याची कथा दिली होती. एका व्यापाऱ्याने १० कामगाराच्या नावाने बनावट माहिती सादर करून क्रेडिट कार्ड मिळवत बँकेला लाखो रुपयांचा चुना लावला होता. ही माहिती वाचल्यानंतर मुजावर याने ही २०१४ मध्ये पहिल्यांदा बँकेच्या क्रेडिट कार्ड यादीत बनावट क्रेडिट कार्डची माहिती देत फसवणुकीचा प्रयत्न केला.  मुजावरची ही चोरी बँकेच्या लेखापालने न पकडल्यामुळेच मुजावरने पुढे ही फसवणूक सुरू ठेवल्याची माहिती दिली.  


कोलकातात लाॅकर

फसवणुकीतील पैशातूनच आपण बँकेतील कर्मचाऱ्यांना गोव्याला पिकनिकला नेल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याचबरोबर महागडी गाडी आणि घरातील वस्तू खरेदी खरेदी केल्या असून कोलकाता येथील युनियन बँकेच्या गोरिया येथील शाखेत असलेल्या लाॅकरमध्ये १० ते १२ लाखांचे सोने घेऊन ठेवल्याची कबुली मुजावरने पोलिसांना दिली आहे. 



हेही वाचा - 

सावधान ...मोबाइलवर येणारी अनोळखी लिंक खिशाला लावेल कात्री

मालिकेत काम देण्याच्या नावाखाली ८० जणांची फसवणूक, दोघे अटकेत




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा