गँगस्टर प्रसाद पुजारीची चिंधीगिरी, अवघ्या लाखांच्या खंडणीसाठी दाखवली हतबलता

ऐकीकाळी ज्या व्यक्तींच्या एका फोनने मुंबईतील नामकिंत बांधकाम व्यावसायिकांना दरदरून घाम फुटायचा, असा कुख्यात डाॅन प्रसाद पुजारी पैशांना इतका मोहताज झाला आहे की, अवघ्या लाखांसाठी त्याला चिंदीकरत दुसऱ्यांकडे हात पसरण्याची वेळ आली आहे. धमकी देण्यासाठी माणूस भेटत नाही म्हणून मावस भावालाच २५ हजार देऊन पोलिसांच्या जाळ्यात अडकवलं. गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांनी पुजारीचा मावस भाऊ सुकेश कुमार के याला कर्नाटकमधून अटक केली आहे.   

हेही वाचाः- आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल, मनसेची पालिका आयुक्तांकडे तक्रार

 विक्रोळीच्या टागोरनगर परिसरात कुख्यात गुंड प्रसाद पुजारीने १९ डिसेंबरला सकाळी सातच्या सुमारास शिवसेनेच्या उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळ्या झाडून आपली दहशत कायम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा तो प्रयत्न फसला. उलट या प्रकरणात गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या हल्लेखोराला जाधव यांच्यासोबत असलेल्या तरुणांनी पकडले आणि बेदम मारहाण केली. त्याने सुरुवातीलाच जाधव यांची सुपारी पुजारीने दिल्याचे जमावासमोर कबूल केले होते. गुन्ह्य़ाचे गांभीर्य, संघटित टोळीच्या सहभागाचा संशय लक्षात घेता पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपवला. पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अजय सावंत, पोलीस निरीक्षक सचिन कदम आणि पथकाने सर्वप्रथम हल्लेखोराकडे चौकशी केली. जाधव यांच्यावर हल्ला ३२ बोअरच्या पिस्तुलाने केला.  हल्यासाठी वापरलेले पिस्तूल कानपूरच्या शस्त्रनिर्मिती कारखान्यात तयार झाले होते. कारखान्यातील नोंदींवरून पथकाने अधिकृत शस्त्रविक्रेता आणि शस्त्रमालकाला शोधून काढले. त्यांच्या चौकशीसह तांत्रिक तपासाआधारे खंडणीविरोधी पथकाने मध्य प्रदेश आणि ठाण्यात छापे घालून कृष्णधर सिंह आणि आनंद फडतरे या दोघांना अटक केली. सिंह याच्या चौकशीत जाधव यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या तरुणाचे नाव सागर मिश्रा असल्याचे स्पष्ट झाले. परदेशात दडलेल्या गुंड पुजारी याने कृष्णधर सिंह आणि सागर मिश्रा यांना जाधव यांच्या हत्येची सुपरी दिली होती. दोघे मुंबईत आल्यानंतर पुजारी याच्या साथीदाराने त्यांना आश्रय दिला. तर या साथीदाराने दोघांना सर्वतोपरी साहाय्य करण्याच्या सूचना फडतरे याला केल्या. फडतरे याने नंबर प्लेट काढलेली दुचाकी उपलब्ध करून दिली.  राजकीय संरक्षण लाभलेल्या प्रतिस्पर्धी संघटित टोळीला शह देण्यासाठी पुजारीने जाधव यांच्या हत्येचा कट आखला होता.

हेही वाचाः- मुंबईत लोकल ट्रेनमध्ये रोज ७० ते ८० मोबाइल चोरीला

 पुजारीचा प्रयत्न फसला खरा, मात्र तरी ही तो शांत बसला नाही. त्याने इतरांना उपद्रव देणे सुरूच ठेवले.  नुकतीच त्याने विक्रोळीतील एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावले. पुजारीने परदेशातून बांधकाम व्यावसायिकाला इंटरनेट व्हाॅट्स अॅप व बोटिंग अॅपद्वारे संपर्क साधून ‘मै सबसे एक करोड लेता हू! तू मेरे ऐरिया का है! तू मुझे १० लाख देना! मालुम है ना मेने विक्रोली मे एक को चाॅकलेट दिया है!’ वारंवार खंडणीसाठी फोन येऊ लागल्यानंतर व्यावसायिकाने फोन घेणे टाळले. पोलिसांनी साथीदारांची धरपकड केल्याने २५ हजार रुपयांचे लालच दाखवून पुजारीने स्वतःच्यात मावस भाऊ सुकेशला व्यावसायिकाच्या कार्यालयात पाठवले. या प्रकरणी  व्यावसायिकाने पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिस सुकेशच्या मागावर होते. अखेर गुन्हे शाखा ७ चे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश तावरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मस्तुद, महेंद्र दोरकर, पोलिस नाईक नागनाथ जाधव यांनी मोठ्या शिताफीने आरोपीस कर्नाटकच्या उडपी येथील कुथीयार येथून अटक केली आहे. तपासात त्याला पुजारीने २५ हजार खात्यावर पाठवल्यानंतर तो व्यावसायिकाच्या कार्यालयात पुजारीचा संदेश घेऊन आला असल्याचे स्पष्ठ झाले. या प्रकरणी गुन्हे शाखा ७ चे पोलिस अधिक तपास करत आहेत. 

पुढील बातमी
इतर बातम्या