Advertisement

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये रोज ७० ते ८० मोबाइल चोरीला

मुंबईतील (mumbai ) लोकल ट्रेन (local train) ही मोबाइल (mobile) चोरांसाठी (theft) कुरणच आहे. रोज लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचे ७० ते ८० मोबाइल चोरीला (stolen) जात आहेत.

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये रोज ७० ते ८० मोबाइल चोरीला
SHARES

मुंबईतील (mumbai ) लोकल ट्रेन (local train) ही मोबाइल (mobile) चोरांसाठी (theft) कुरणच आहे. रोज लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचे ७० ते ८० मोबाइल चोरीला (stolen) जात आहेत. मात्र, यामधील अवघे २ ते ३ मोबाइल शोधण्यास रेल्वे पोलिसांना यश येतं. त्यामुळे लोकलमधून मोबाइल चोरीला गेल्यास तो परत मिळणारच नाही याची खात्रीच प्रवाशांना झाली आहे.   मागील दोन वर्षांत मोबाइल चोरीच्या ५६ हजार १९८ घटनांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी ४ हजार ६२८ मोबाइल चोरीच्या घटनांची उकल झाली आहे.

मुंबईत रोज लाखो प्रवाशी लोकल (local train) मधून प्रवास करतात. लोकलमधील प्रचंड गर्दीचा फायदा मोबाइल चोर (Mobile thieves ) घेतात. १ जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१८ पर्यंत लोकलमधून ५९ हजार ९०४ मोबाइल चोरीला गेले आहेत. यामधील फक्त ८ हजार ८६८ मोबाइल सापडले आहेत. २०१८ मध्ये ३२ हजार ४७६ मोबाइल (mobile) चोरीला गेले असून यातील फक्त २ हजार ५१७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर २०१९ मध्ये २३ हजार ७२२ मोबाइल चोरी झाले असून, त्यापैकी २ हजार १११ घटनांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात मोबाइल (mobile) चोरीच्या घटना घडत असतात. मात्र, गर्दी असलेल्या स्थानकांमध्ये सर्वाधिक मोबाईल चोरी होत आहेत. बोरीवली, कल्याण, ठाणे, कुर्ला आणि वडाळा या गर्दीच्या स्थानकात सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना घडत आहेत. मोबाइल चोरीची तक्रार प्रवाशाने केल्यावर पोलिसांद्वारे (police) मोबाइल ट्रॅकिंगवर टाकला जातो. मात्र खूप कमी मोबाइल ट्रॅक होतात. चोरीला गेलेले मोबाइल देशातील इतर राज्यात आणि नेपाळमध्ये विकले जात आहेत. हे मोबाइल शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांच्यावतीने विशेष पथकाची फौज तयार केली आहे.

मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटनांची नोंद कुर्ला (kurla), ठाणे (thane) आणि बोरीवली (boriwali) स्थानकावर करण्यात आली आहे. गर्दीमध्ये चोरट्यांना मोबाइल चोरणं सोपं जात असल्याने या गर्दीच्या तीन स्थानकांमध्ये सर्वाधिक मोबाइल (mobile) चोरी झाले आहेत. लोकलच्या दारावर मोबाइल घेऊन उभ्या असणाऱ्या प्रवाशांकडून मोबाइल हिसकावून चोरटे पळ काढत असतात. मोबाइल चोरल्यानंतर चोरटे मोबाइल बंद करतात. त्यानंतर हा चोरीचा मोबाइल ते चोर बाजारात विकतात. या मोबाइलचा आयएमई क्रमांकही बदलला जातो. असे मोबाइल दुसऱ्या राज्यातही विकले जातात. त्यामुळे असे चोरीला गेलेले मोबाइल पुन्हा मिळणे अशक्य होते. 



हेही वाचा -

एलबीएस मार्गावरील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाईचा धडाका

मुंबईत जमावबंदीचे आदेश




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा