मुंबईत जमावबंदीचे आदेश

दिल्लीच्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत त्याचे कोणतेही पडसाद उमटू नयेत. याकरता मुंबई पोलिसांनी मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

मुंबईत जमावबंदीचे आदेश
SHARES

दिल्लीच्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत त्याचे कोणतेही पडसाद उमटू नयेत. याकरता मुंबई पोलिसांनी मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे पाच जणांहून अधिक व्यक्तींनी एकत्रित येत, शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केल्यास त्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अभियान यांनी दिली आहे. 

 

मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या अनुशंगाने मुंबई पोलिसांनी जमाव बंदीचे आदेश जारी केले आहे. ९ मार्च पर्यंत जमावबंदी मुंबईत राहणार आहे. त्यातून विवाह समारंभ आणि त्याच्याशी संबंधित अन्य कार्यक्रम, अंत्यविधीसंबंधिक कार्यक्रम, सहकारी संस्था, कंपन्या संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाच्या कार्यक्रमांना यातून वगळण्यात आले आहेत. तसंच मोर्चा काढणं, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती जमणं, जमाव करून फटाके फोडणे, सांगितीय बॅड याला प्रतिबंध करण्यात आला आहे. 

 चित्रपटगृह, नाट्यगृहांना वगळलं

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणं, न्यायालयं, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावाला या आदेशातून वगळण्यात आलं आहे.

हेही वाचाः -आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला,महानगर पालिका निवडणूका एकत्र लढवणार ?

हेही वाचाः-मुंबईतील 'या' रस्त्यावर ३ महिने पार्किंगबंदी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा