Advertisement

मुंबईतील 'या' रस्त्यावर ३ महिने पार्किंगबंदी

सार्वजनिक वाहनतळ परिसरात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर ३ महिने पार्किंगबंदी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

मुंबईतील 'या' रस्त्यावर ३ महिने पार्किंगबंदी
SHARES

मुंबईतील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याचा फटका रस्ते वाहतुकीवर (Road Transport) बसत आहे. मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणी विकासकामं सुरू आहे. त्यामुळं या मार्गावरून वाहतुकीसाठी रस्त्याचा (Road) कमी भाग वाहतुकीसाठी मिळतो. मात्र, याठिकाणी अनधिकृतरित्या वाहनांची पार्किंगदेखील असून, मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी (Traffic Jam) निर्माण होत आहे. त्यामुळं अनधिकृत पार्किंगला (illegal parking) लगाम लावण्यासाठी सार्वजनिक वाहनतळ (Public Parking) परिसरात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर ३ महिने पार्किंगबंदी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) घेतला आहे.

मुंबई महापालिकेनं (BMC) एफएसआयच्या (FSI) बदल्यात सार्वजनिक वाहनतळाची तरतूद केली आहे. सार्वजनिक वाहनतळामुळं नागरिकांना सोईस्कर आणि सुलभरीत्या त्यांची वाहनं वाहनतळात पार्क करता येतात. त्यामुळं रस्त्यावर अनधिकृत पार्किंग कमी होते, तसेच वाहतूक सुरळीत होते. महापालिकेनं एफपीएन ४६, टीपीएस ३, माहिम विभाग, एनसी केळकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर पश्चिम येथील कोहिनूर सीटीएनएलमध्ये वाहनतळ सुरू केले असून, ते अवजड वाहने, चारचाकी वाहनांसाठी खुले करण्यात आले आहे.

अनधिकृत पार्किंगला लगाम लावण्यासाठी सार्वजनिक वाहनतळ परिसरात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर २९ फेब्रुवारी ते ३१ मे हे ३ महिने कोणतंही खासगी किंवा सार्वजनिक वाहन पार्क करता येणार नाही. तसंच, अनधिकृत पार्किंगसाठी अन्य उपापयोजना केली जाणा आहे.

नो पार्किंगचे रस्ते

  • जेके सावंत मार्ग
  • एनसी केळकर मार्ग
  • अक्षीकर पथ
  • वाचनालय मार्ग
  • रानडे रोड
  • डिसिल्व्हा रोड
  • गणेश पेठ लेन
  • राम मारुती रोड
  • डीएल वैद्य मार्ग
  • शिवसेना पथ
  • एमबी राऊत मार्ग
  • एनसी केळकर विस्तारित मार्ग
  • केळुस्कर दक्षिण मार्ग
  • पद्माबाई ठक्कर मार्ग
  • बाळ गोविंददास रोड
  • मनोरमा नगरकर मार्ग



हेही वाचा -

टोल दरवाढीचा एसटीला फटका

उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरेंवर सोपवली ही जबाबदारी, राऊत मात्र नाराज ?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा