Advertisement

उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरेंवर सोपवली ही जबाबदारी, राऊत मात्र नाराज ?

उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते

उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरेंवर सोपवली ही जबाबदारी, राऊत मात्र नाराज ?
SHARES

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. रश्मी ठाकरे या आजपासून संपादकपदी असतील. याआधी उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते. मात्र भावाला मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या संजय राऊतांना संपादकपदाची आशा होती. ती ही न मिळाल्यामुळे राऊत नाराज असल्याचे बोलले जाते. 

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे अद्याप कोणतीही मोठी जबाबदारी नव्हती. मात्र, आता त्या सामनाच्या संपादकपदी असणार आहेत. संपादक हे पद लाभाचे पद असल्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात अडचणी होत्या. त्यामुळे आता सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी ही रश्मी ठाकरेंकडे सोपवण्यात आली आहे. क्रेडिट लाइनमध्ये आता रश्मी ठाकरे यांचे नाव अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे हे सामनाच्या संपादकपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. त्यामुळे गेले काही महिने हे पद रिक्त होते. सध्या संपूर्ण जबाबदारी ही संजय राऊत यांच्याकडे होती. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची भूमिका मांडत होते.

९० च्या दशकात आपली राजकीय भूमिका, विचार महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या दैनिकाची सुरुवात केली. २३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री ‘सामना’ दैनिकाची सुरुवात झाली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले. “हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, सामना हे नवे शस्त्र असेल आणि उद्या पाळी आली तर, आम्हाला खऱ्या शस्त्रालाही हात घालावा लागेल” असे प्रकाशनाप्रसंगी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. ‘या असे सामन्याला’ हा सामनाचा पहिला अग्रलेख होता. या अग्रलेखात सामना सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांनंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे सामनाचे संपादक झाले. पण आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. भविष्यात सामनाच्या संपादकपदामुळे अडचणी येण्याची शक्यता असल्याने आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सामनाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा