Advertisement

टोल दरवाढीचा एसटीला फटका

टोल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला (MSRTC) वर्षाला सरासरी ३ ते ४ कोटींचा फटका बसणार आहे.

टोल दरवाढीचा एसटीला फटका
SHARES

मुंबईहून पुण्याच्या दिशेनं व पुण्याहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Express Way) हा मार्ग महत्वाचा आहे. या एक्स्प्रेस वेवरील टोल महागणार असून १ एप्रिलपासून नवे दर (New Rate) लागू होणार आहेत. मात्र, टोलच्या दरवाढीमुळं या महामार्गावरून धावणाऱ्या एसटीला एका फेरीसाठी १२२ रुपये ज्यादा मोजावे लागणार आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाला (MSRTC) वर्षाला सरासरी ३ ते ४ कोटींचा फटका बसणार आहे.

सध्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका फेरीसाठी ६७५ रुपये, तर मुंबई-पुणे-मुंबई या मार्गासाठी १ हजार ३५० रुपये टोल भरावा लागतो. मात्र, टोलमध्ये दरवाढ झाल्यानंतर १ एप्रिलपासून एका फेरीसाठी १२२ आणि मुंबई-पुणे-मुंबई मार्गासाठी २४४ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानुसार, २ फेऱ्यांसाठी एकूण १ हजार ५९४ रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर दिवसाला सरासरी ७०० ते ८०० फेऱ्या होतात. परिणामी, एसटीच्या तिजोरीतून एका दिवसाला दीड ते २ लाख जादा मोजावे लागणार आहेत. त्यामुळं वर्षाला सरासरी ३ ते ४ कोटींचा फटका बसणार असल्याची भिती एसटी महामंडळाला सतावत आहे.

एसटीला राज्यभरातून वर्षाला १४६ कोटींचा टोल भरावा लागतो. याचा भार एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडतो. मात्र, कर्नाटक राज्यातील एसटी महामंडळ प्रवाशांच्या तिकिटाच्या रकमेतून टोल वसूल करते. त्यामुळं मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल दरवाढीनंतर प्रवाशांच्या खिशातून ही रक्कम वसूल केली जाईल का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. कारण या टोल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसणार आहे.

टोलचे नवे दर

  • कारसाठी सध्याचा टोल आहे २३० रुपये असून, १ एप्रिलपासून हा दर २७० रुपये होणार आहे.
  • मिनीबससाठी सध्या ३५५ रुपये टोल आकारला जात असून, १ एप्रिलपासून हा टोल ४२० रुपये होणार आहे.
  • बससाठी सध्या ६७५ रुपये टोल आकारला जात असून, १ एप्रिलपासून हा टोल ७९७ रुपये होणार आहे.
  • ट्रक टू अॅक्सलसाठी सध्या ४९३ रुपये टोल आकारला जात असून, १ एप्रिलपासून हा टोल ५८० रुपये होणार आहे.
  • क्रेन किंवा तत्सम अवजड वाहने आणि टू अॅक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना सध्या १५५५ रुपये टोल आकारला जात असून, हा टोल १ एप्रिलपासून १८३५ रुपये इतका आकारला जाणार आहे.



हेही वाचा -

प्लास्टीकबंदी : रेल्वे परिसरातील जाहिरातींसाठी कापडी बॅनर

आपत्कालीन परिस्थितीत लोकल सेवा सुरक्षित



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा