Advertisement

प्लास्टीकबंदी : रेल्वे परिसरातील जाहिरातींसाठी कापडी बॅनर

रेल्वेमध्ये आता संपूर्ण प्लास्टीकबंदीची सुरुवात करण्यात येणार आहे.

प्लास्टीकबंदी : रेल्वे परिसरातील जाहिरातींसाठी कापडी बॅनर
SHARES

मुंबई महापालिकेनं (BMC) १ मार्चपासून मुंबईत प्लास्टिक बंदीच्या (Plastic Ban) अंमलबजावणीला सुरूवात केल्यानंतर रेल्वेमध्ये आता संपूर्ण प्लास्टीकबंदीची सुरुवात करण्यात येणार आहे. रेल्वेच्या अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापर होताना दिसतो. त्यामुळं हा प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी रेल्वे कार्यालय आणि इतर परिसरात दिसणारे बॅनर (Banners), प्लास्टीकच्या पोस्टरवर पूर्णपणे बंदी करण्यात येणार आहे.

रेल्वे स्थानकात जाहिरातीसाठी (Advertiesment) वापरले जाणारे बॅनरही बंद होणार आहेत. त्याऐवजी कापडी बॅनर वापरण्याच्या सूचना रेल्वे मंडळाकडून प्रत्येक रेल्वे विभागाला देण्यात आल्या आहेत. नुकताच पर्यावरण मंत्रालयाकडून रेल्वे मंडळाला प्लास्टीक बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, रेल्वे मंडळाकडून भारतीय रेल्वेत (Indian Railway) संपूर्ण प्लास्टीकबंदी करण्यास सुरुवात होणार आहे.

रेल्वे परिसरातील जाहिरातींसाठी कापडी बॅनर, पेपर यांसारख्या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला जाणार आहे. प्लास्टीक वस्तूंमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा वस्तू वापरणे बंद करून, पर्यावरणपूरक वस्तू वापरण्यावर भर देण्याच्या सूचना रेल्वे मंडळाने रेल्वे विभागाला दिल्या आहेत.

स्वच्छ भारत अभियान दिनी भारतीय रेल्वेमध्ये 'वन टाइम यूज प्लास्टीक'ला (One Time use plastic) बंदी घालण्यात आली. ‘वन टाइम यूज प्लास्टीक’ला पर्यायी वस्तू वापरण्यास काही ठिकाणी सुरुवात करण्यात आली. रेल्वे स्थानकावरील स्टॉलधारकांना आणि मेल, एक्स्प्रेसमधील विक्रेत्यांना प्लास्टीकचे कप, खाद्यपदार्थासाठी वापरण्यात येणारी प्लास्टीक पिशवी बंद करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं (Railway) दिल्या आहेत.

आयआरसीटीसीच्या (IRCTC) वतीने विक्री केल्या जाणाऱ्या रेल नीरच्या प्लास्टीक बाटल्या, प्लास्टीक बॉटल क्रशर मशिनद्वारे चुरा केल्या जात आहेत. आता रेल्वे कार्यालयात, रेल्वे परिसरात वापरले जाणारे प्लास्टीक पोस्टर, बॅनर बंद केले जातील. त्याऐवजी पर्यावरणपूरक वस्तुंचा वापर केला जाणार आहे.



हेही वाचा -

१ मार्चपासून बंदीयोग्य प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई

आपत्कालीन परिस्थितीत लोकल सेवा सुरक्षित



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा