Advertisement

आपत्कालीन परिस्थितीत लोकल सेवा सुरक्षित


आपत्कालीन परिस्थितीत लोकल सेवा सुरक्षित
SHARES
अनेकदा आपत्कालीन परिस्थिति आल्यास सुखरूप ठिकाणी पोहोचण्यास वेळ लागतो. त्याचप्रमाणे असेच अनेक आपत्कालीन प्रसंग निर्माण झाल्यास अल्पावधीत मुंबईत पोहोचण्यासाठी वाहतुकीच्या मार्गाची चाचणी घ्यावी यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाने नुकतेच मॉकड्रिल केले. यामध्ये मुंबईची लोकल ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पोहोचण्यासाठी विश्वासार्ह साधन असल्याचे समोर आले आहे.


आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास अल्पावधीत मुंबईत पोहोचण्यासाठी वाहतुकीच्या मार्गाची चाचणी घ्यावी यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाने नुकतेच मॉकड्रिल केले. कमांडोचा समावेश असलेले मुंबई लोकलमधील हे पहिलेच मॉकड्रिल ठरले. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी आणि सरकारी कार्यालये आहेत. यामुळे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचण्यासाठी मॉकड्रिल घेण्याचा निर्णय एनएसजीने घेतला. 

'पवई ते सीएसएमटी' असा पल्ला पार करण्यासाठी रेल्वे मार्गाने एनएसजीच्या १२० जवानांचे पथक रवाना झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारास कांजूरमार्ग स्थानकातून ठाणे-सीएसएमटी लोकलमधून या पथकाने सीएसएमटी गाठले. 

या प्रवासात शस्त्रधारी जवानांसह श्वानपथकाचाही समावेश होता. पवई ते कांजूरमार्ग १५ मिनिटे आणि कांजूरमार्ग ते ठाणे ४५ मिनिटे असे एकूण एक तासात पवई ते सीएसएमटी असा टप्पा पूर्ण करण्यात आला. पवई ते सीएसएमटी या अंतरासाठी रस्ते मार्गाने तब्बल १ तास ३० मिनिटांचा वेळ लागतो. यामुळे आपत्कालीन स्थितीत मुंबईत पोहोचण्यासाठी मुंबई लोकल योग्य असल्याची माहिती मिळते. 

मॉकड्रिलदरम्यान रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रण आणि समन्वयाची जबाबदारी सांभाळली. अचानक आलेल्या शस्त्रधारी जवानांमुळे चर्चेला उधाण आले होते. जवानांना घेऊन लोकल रवाना झाल्यानंतर प्रवाशांचा संभ्रम दूर झाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा