देशी कट्ट्यासह तरूणाला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

घाटकोपर परिसरात देशी कट्ट्यासह फिरणाऱ्या एका २५ वर्षीय सराईत आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. अशोक राजाराम गंगावणे उर्फ खदान राजा असं या आरोपीचं नाव आहे. अशोक विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात ७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

सराईत गुन्हेगार

नवी मुंबईच्या तळोजा परिसरात राहणाऱ्या अशोकला या पूर्वी घाटकोपर परिसरात चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात ७ वेळा अटक करण्यात आली आहे. मात्र जामिनावर बाहेर पडल्यानंतर अशोक पुन्हा गुन्हेगारीकडं वळतो. २९ एप्रिल रोजी अशोक देशी कट्टा घेऊन परिसरात फिरत असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी असल्फा परिसरात सापळा रचून अशोकला अटक केली.

शस्त्र कुठून आणलं?

पोलिसांनी अशोकची झडती घेतली असता. त्याच्याजवळ एक देशी कट्टासह १२ जिवंत काडतूस आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. अशोकने हे घातक शस्त्र कुठून आणलं व कशासाठी याचा पोलिस शोध घेत आहेत.


हेही वाचा-

कांजूरमार्ग पोलिसांच्या 'थर्ड डिग्री'ने आरोपीचा मृत्यू?

गरजा भागवण्यासाठी तरुणांना लाखोंचा गंडा


पुढील बातमी
इतर बातम्या