कांजूरमार्ग पोलिसांच्या 'थर्ड डिग्री'ने आरोपीचा मृत्यू?

कारागृहातील डाॅक्टरांनी १० हजार रुपयांची लाच मागितली. कालांतराने प्रदीप यांच्या पायाला गँगरीन झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं प्रदीप यांच्या पायाची बोट काढून त्यावर ठाणे येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र जखम इतकी गंभीर होती की, प्रदीप यांचा पाया काढावा लागणार होता. त्यावेळी प्रदीप यांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान प्रदीप यांचा २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला.

  • कांजूरमार्ग पोलिसांच्या 'थर्ड डिग्री'ने आरोपीचा मृत्यू?
SHARE

घरांच्या व्यवहारात नागरिकांची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून कांजूरमार्ग पोलिसांनी अटक केलेल्या ४७ वर्षीय आरोपीचा जे.जे. रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. प्रदीप राऊत असं या मृत आरोपीचं नाव आहे. गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांनी पायावर केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या प्रदीला गँगरिन झालं. त्यावर उपचार सुरू असताना प्रदीप यांचा जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाल्याचा आरोप प्रदीप यांचा मुलगा जय याने केला आहे. वडिलांना अमानुष मारहाण करत पैशांची मागणी करणारे व वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबतची तक्रार जयने पोलिस उपायुक्तांकडे केली आहे.


काय आहे प्रकरण?

भांडुप परिसरात राहणारे प्रदीप १९९६ मध्ये रिक्षा चालवायचे. एकत्र कुटुंब असल्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. अशातच प्रदीप यांनी एलआयसी एजंटचा व्यवसाय सुरू केला. पुढे परीक्षा देऊन त्यांनी स्वतः गूंतवणूकदार म्हणून प्रमाणपत्र मिळवलं. कालांतराने व्यवसाय वाढीसाठी त्यांनी त्यांची पत्नी प्रणाली आणि मुलगा जय राऊत यांची नावेही एलआयसी एजंट म्हणून नोंदवली. काही वर्षांपूर्वी प्रदीप यांनी भांडुप परिसरातील ६ फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली. या फ्लॅटच्या व्यवहारातून तक्रारदार आणि प्रदीप मध्ये मतभेद झाल्याने प्रदीप यांच्या विरोधात कांजूर मार्ग पोलिस ठाणे व भाडुंप पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.पत्नी, मुलगा सहआरोपी

प्रदीप यांनी पैशांचे व्यवहार त्यांची पत्नी आणि मुलाच्या खात्यावरून केल्याने पोलिसांनी त्यांना देखील सह आरोपी केलं होतं. प्रदीपच्या अटकेनंतर त्या दोघांनी उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. भांडुप पोलिसांनी प्रदीपला अटक केली. न्यायालयाने प्रदीप यांना पोलिस कस्टडी सुनावल्यानंतर कांजूर मार्ग पोलिसांनी प्रदीप यांचा ताबा मागितला.


पोलिस ठाण्यात 'थर्ड डिग्री'

कांजूर मार्ग पोलिस ठाण्यात चौकशी दरम्यान पोलिसांनी प्रदीप यांनी तळपायाला गंभीर मारहाण केली. या मारहाणीत प्रदीप यांच्या पायाला गंभीर जखम झाली. न्यायालयाने प्रदीप यांना ठाणे कारागृहात हलवलं. प्रदीप यांना मधुमेहाचा त्रास असल्याने ती जखम वाढतच गेली. ठाणे कारागृहातील डाॅक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याबाबत विनंती केली.


डाॅक्टरांनी लाच मागितली

त्यावेळी कारागृहातील डाॅक्टरांनी १० हजार रुपयांची लाच मागितली. कालांतराने प्रदीप यांच्या पायाला गँगरीन झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं प्रदीप यांच्या पायाची बोट काढून त्यावर ठाणे येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र जखम इतकी गंभीर होती की, प्रदीप यांचा पाया काढावा लागणार होता. त्यावेळी प्रदीप यांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान प्रदीप यांचा २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला.


पोलिसांकडून धमकी

वडिलांवर जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू होते. मारहाणीत झालेल्या जखम चिघळल्याने व वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांना गँगरीन झालं होतं.१८ एप्रिल रोजी त्यांचा पाय काढावा लागणार हे कळाल्यावर आम्ही रुग्णालयात त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी वडिलांनी कांजूरमार्गच्या पोलिसांनी खूप मारलं. त्यामुळे ही जखम झाल्याचं सांगितलं. एवढंच नाही, तर त्यांनी ५ लाख रुपयांची मागणी देखील केली. पैसे न दिल्यास मुलगा आणि पत्नीला देखील आत टाकू अशी धमकी दिल्याचं जय ने "मुंबई लाइव्ह"शी बोलताना सांगितलं.हेही वाचा-

आईच्या निधनामुळे 'डॅडी'ची फर्लोची रजा मंजूरसंबंधित विषय
ताज्या बातम्या