आईच्या निधनामुळे 'डॅडी'ची फर्लोची रजा मंजूर

आईची प्रकृती नाजूक असल्याचं कळताच गवळीने फर्लोची रजा मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र 'डॅडी'ला रजा देण्यात आली नव्हती. शनिवारी दुपारी आईच्या निधनानंतर 'डॅडी'चा अर्ज मंजूर करत त्याला ४५ दिवसांच्या सुट्टी देण्यात आली.

आईच्या निधनामुळे 'डॅडी'ची फर्लोची रजा मंजूर
SHARES

कुख्यात गुंड अरुण गवळी याची आई लक्ष्मीबाई गवळी यांचं शनिवारी जसलोक रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झालं. त्यामुळे 'डॅडी'ची फर्लोची ४५ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली आहे. आईची प्रकृती गंभीर असल्याचं कारण देत या पूर्वीही गवळीने सुट्टीसाठी अर्ज केला होता. मात्र आईला बघण्यासाठी येणार त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.


आधीही केला होता अर्ज

गवळी सध्या दिवंगत शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. मागील काही दिवसांपासून गवळीची आई लक्ष्मीबाई हिची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते.


नागपूरहून आल्यावर अंत्यसंस्कार

आईची प्रकृती नाजूक असल्याचं कळताच गवळीने फर्लोची रजा मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र 'डॅडी'ला रजा देण्यात आली नव्हती. शनिवारी दुपारी आईच्या निधनानंतर 'डॅडी'चा अर्ज मंजूर करत त्याला ४५ दिवसांच्या सुट्टी देण्यात आली. नागपूरहून डॅडी आल्यानंतर लक्ष्मीबाई यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

मम्मीच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

आशा गवळीवर अटकेची टांगती तलवार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा