मुंबईतून ३३ लाखांचा गुटखा जप्त

देशात गुटखा बंदी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. मात्र, शेजारील राज्यातून गुटखा आयात करुन छुप्या पद्धतीने विक्री अद्याप सुरू असल्याचं दिसून येतं. मुंबईच्या गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी अंधेरी आणि साकीनाका परिसरात दोन विविध कारवाईत तब्बल ३३ लाखांचा गुटखा जप्त केला आहे.

मुंबईच्या गुन्हे शाखा १० च्या पोलिसांना अंधेरी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात सुगंधीत गुटखा, सुपारी आणि सिगारेटचा साठा लपवण्याती आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा १० चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अंधेरी एमआयडीसीच्या कृष्णा नगर रोड नंबर १९ येथील गोडाऊनवर १८ सप्टेंबर छापा टाकला. त्यावेळी गोडाऊनमध्ये १९ लाख ५० हजारांचा गुटखा आणि ६८ हजारांचे विदेशी सिगारेट पाकिट सापडली.  या प्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

 दुसरीकडे साकीनाका परिसरातील गौसिया मार्केट, जंगलेशअवर मंदिर रोडवरील गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी त्या गोडाऊनमधून तब्बल १० लाखांचा पानमसाला आणि सुगंधीत गुटखा हस्तगत केला. हा गुटखा कुठून आणला आणि कुठे पाठवण्यात येत होता याचा आता पोलिस शोध घेत आहेत.


हेही वाचा -

महाराष्ट्र एटीएसला आंध्रप्रदेश सरकारकडून ८ लाखांचं बक्षीस

२ शिक्षकांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवाने अडकले सुरक्षा जाळीत


पुढील बातमी
इतर बातम्या