२ शिक्षकांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवाने अडकले सुरक्षा जाळीत

दोन शिक्षकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने हे दोन्ही शिक्षक सुरक्षा जाळीत पडल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

२ शिक्षकांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवाने अडकले सुरक्षा जाळीत
SHARES

दोन शिक्षकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने हे दोन्ही शिक्षक सुरक्षा जाळीत पडल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. हेमंत पाटील आणि अरुण नेतोरे अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत


राज्यातील ३०० दिव्यांग शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी दोघेही मंत्रालयात आले होते. सरकार आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं सरकारचा निषेध करत ते मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचले आणि दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून खाली उडी घेतली. 

मंत्रालयात मध्यंतरी अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने दुसऱ्या मजल्याजवळच सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. या सुरक्षा जाळीतच हे दोघेही अडकले. त्यानंतर मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनी या दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढून पोलिसांच्या हवाली केलं.हेही वाचा-

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : ‘त्या’ तिघांवर नोंदवणार एफआयआर

शिक्षकांवर पोलिसांचा लाठीमार, आझाद मैदानातील आंदोलनाला गालबोटसंबंधित विषय