Advertisement

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : ‘त्या’ तिघांवर नोंदवणार एफआयआर

सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाला सादर करत शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची शिफारस केली आहे.

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : ‘त्या’ तिघांवर नोंदवणार एफआयआर
SHARES

मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करणारे ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांना जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला न देणारे तत्कालीन जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसीलदार रोहिदास खैरनार या २ अधिकाऱ्यांसह मध्यस्त दत्तात्रय देसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस याप्रकरणी नेमण्यात आलेल्या न्या. श्याम दरणे यांच्या चौकशी समितीने केली आहे. 

काय आहे प्रकरण?

धुळे इथं होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली होती. मात्र या जमिनीच्या मोबदल्यात त्यांना केवळ ४ लाख रूपये देण्यात आले होते. या जमिनीवर पाटील यांनी आंब्याची ६०० झाडे लावली होती. त्यासाठी ठिबक आणि सिंचनाची व्यवस्थाही केली होती. 

केलं विष प्राशन

तरीही त्यांना योग्य मोबदला न मिळाल्याने ते न्यायाच्या प्रतिक्षेत सलग ३ महिने मंत्रालयात खेटा घालत होते. असं असूनही त्यांच्या मागणीची दखल घेण्यात येत नसल्याने यांनी २२ जानेवारी २०१८ रोजी नैराश्येतून मंत्रालयात विष प्राशन केलं. यात त्यांचा २८ जानेवारीला मृत्यू झाला होता.

जमिनीचं फेरमूल्यांन

त्यांच्या मृत्यूनंतर सरकारने पाटील यांच्या जमिनीसह १९९ हेक्टर शेतीचं फेरमूल्याकंन करून पाटील यांच्या मुलाला ५४ लाख रूपये मोबदला देण्याचा अहवाल धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. तसंच सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाला सादर करत संबंधित तिघांकडून कामात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला आहे.हेही वाचा-

मंत्रालयातील आत्महत्येच्या प्रयत्नांचा सिलसिला थांबेना

धर्मा पाटलांच्या कुटुंबाला दिलासा, ५४ लाखांचा मिळणार मोबदला!


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा