Advertisement

शिक्षकांवर पोलिसांचा लाठीमार, आझाद मैदानातील आंदोलनाला गालबोट

राज्यातील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान दुपारी काढण्यात आलेला मोर्चा आक्रमक होताच पोलिसांकडून शिक्षकांवर लाठीमार करण्यात आला.

शिक्षकांवर पोलिसांचा लाठीमार, आझाद मैदानातील आंदोलनाला गालबोट
SHARES

राज्यातील कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान दुपारी काढण्यात आलेला मोर्चा आक्रमक होताच पोलिसांकडून शिक्षकांवर लाठीमार करण्यात आला. या लाठीमारात १० ते १५ शिक्षक जखमी झाल्याने आझाद मैदानात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यापैकी दोघा शिक्षकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मागण्या काय?

मराठी व प्रादेशिक भाषेतील ज्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १९ वर्षांपासून अनुदान सुरू केलेले नाही, त्यांचं अनुदान सुरू करावं, ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान सुरू करण्यात आलं आहे, त्यांना नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देऊन कर्तव्यात चालढकल केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावं, इ. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. 


सरकारकडून दुर्लक्ष

गेल्या २१ दिवसांपासून शिक्षक आंदोलन करत असूनही राज्य सरकार त्याची दखल घेत नसल्याने अखेर शिक्षकांनी आझाद मैदानात जमायचं ठरवलं. त्यानुसार सरकार आपली दखल घेत नसल्याच्या नाराजीवरून आंदोलनातील शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेत मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या मोर्चाकडे वळवला होता. त्याच सुमारस आक्रमक शिक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे काहीकाळ मैदानात गोंधळाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

शिष्टमंडळाला निमंत्रण

आंदोलन चिघळल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वत: पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेऊन मोर्चेकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तसंच शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याशी त्वरित संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या ५ जणांच्या शिष्टमंडळांना शेलार यांनी भेटायला बोलावल्यावर आंदोलक शिक्षकांपैकी ५ शिक्षकांचं शिष्टमंडळ मंत्रालयात चर्चेसाठी गेलं.   



हेही वाचा-

मुख्यमंत्री सहय्यता निधीतून ७५ लाख लाटले, डॉक्टरला अटक

बेस्टचा संप तूर्तास टळला, मात्र २६ ऑगस्ट धरणे आंदोलन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा