मालाडमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्राइम

मालाडमध्ये फिल्म प्रोडक्शनच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या सेक्स रॅकेटमध्ये पोलिसांनी एका प्रसिद्ध माॅडेलसह दोन दलालांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला अाहे. नवीन मुलींना चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली हे दलाल बोलवून घेत अाणि नंतर त्यांना सेक्स रॅकेटमध्ये ढकलत असत, असं निदर्शनास आलं आहे.

पाच-सहा माॅडेल्सना अटक

मालाडच्या मार्वे रोडवरील स्वीट चिलीज नावाच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मालाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार 29 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रोडक्शन हाऊसवर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी काही नागरिकांसह पाच ते सहा माॅडेल्सना ताब्यात घेतले.

पंजाबी, हिंदी अल्बमसाठी करत होत्या काम

ताब्यात घेण्यात आलेल्या माॅडेलच्या चौकशीतून त्या पंजाबी आणि हिंदी अल्बमसाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. काही तरुणी या क्षेत्रात नवीन असून काम देण्याच्या नावाखाली दोन्ही दलालांनी त्यांना प्रोडक्शन हाऊसवर बोलवून घेतलं होतं. त्यानंतर चित्रपट किंवा अल्बममध्ये काम हवं असल्यास, हे सर्व करावं लागतं, असं सांगत त्या दोघांनी तरुणींना या सेक्स रॅकेटमध्ये ओढल्याची कबुली तरुणींनी मालाड पोलिसांना दिली आहे. त्यानुसार मालाड पोलिसांनी जेरुपचंद राठोर, इरफान ज्वाला या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर पीटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. न्यायालयानं त्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा - 

सेक्स रॅकेटप्रकरणी टीव्ही कलाकाराला अटक

दीपिकाचा हॉट अँड सेक्सी अंदाज


पुढील बातमी
इतर बातम्या