SHARE

टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकाराला सेक्स रॅकेट प्रकरणांत अटक झाली आहे. मेहुल वाघेला असं या कलाकाराचं नाव असून तो टीव्ही मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करत असल्याचं समजत आहे. चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली तो तरूणींना देहव्यापारात ढकलत असल्याची माहिती बांगूर नगर पोलिसांनी दिली आहे.


५ तरूणींची सुटका

या प्रकरणी मेहुल वाघेलासह त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या तावडीतून २ अल्पवयीन मुलींसह एकूण ५ तरूणींची पोलिसांनी सुटका केली आहे. यातील काही तरूणी मॅाडेल असल्याचं समजत आहे.


'अशी' केली अटक

मालाड परिसरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता बांगूर नगर पोलिसांनी सापळा लावला. बुधवारी रात्री ग्राहक असल्याचं भासवून मालाड मधील एका हॅाटेलात मुलींसह त्यांच्या दलालांना बोलावण्यात आलं आणि ते येताच
पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं.


५० ते २ लाखांत सौदा

या प्रकरणी पिटा अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी एकूण ५ तरूणींची सुटका केली आहे. सध्या या तरूणींना सुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहीती बांगूर नगर पोलिसांनी दिली. प्रत्येक मुलीचा सौदा ५० ते २ लाखांपर्यंत झाल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या