आजारपणाला कंटाळून हिमांशू राॅय यांनी उचललं टोकाचं पाऊल

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) हिमांशू रॉय यांनी शुक्रवारी दुपारी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये आपल्या आत्महत्येप्रकरणी कुणालाही जबाबदार धरू नये. आजारपणाला कंटाऴूनच आपण हे टोकाचं पाऊल उचलल्याचं हिमांशू राॅय यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे.

कुणी नसताना स्वत:वरच गोळी झाडली

चर्चगेट येथील सुरूची या शासकीय इमारतीत राॅय अापल्या कुटुंबियांसोबत राहत होते. दुपारी जेवल्यानंतर १.४० वाजता राॅय यांनी खोलीत कुणी नसताना अापल्याकडील सर्व्हिस रिवाॅल्व्हरने तोंडात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. राॅय यांच्या खोलीतून गोळी झाडण्यात आल्याचा आवाज अाल्यानंतर कुटुंबियांसह त्यांच्या घरातील नोकरांनी खोलीजवळ धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात हिमांशू राॅय बिच्छान्यावर निपचित पडले होते. त्यांना तातडीनं बाँम्बे हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात अालं.

'कुणालाही जबाबदार धरू नये'

रुग्णालयातच राँय यांना डाँक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदनासाठी राँय यांचा मृतदेह जी.टी रुग्णालयात हलवण्यात आला. या प्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात १७४ सीआरपीसीअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस तपासादरम्यान राॅय यांच्या खोलीत पोलिसांना त्यांनी लिहिलेली सुसाइड नोट सापडली. त्यामध्ये त्यांनी आजारपणाला कंटाळून अापण आत्महत्या करत असल्याचे म्हणत याप्रकरणी कुणालाही जबाबदार धरू नये, असं म्हटलं अाहे.


हेही वाचा -

अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू राॅय यांची गोळी झाडून आत्महत्या

हिमांशु रॉय आत्महत्या : राजकीय नेतेमंडळी, बॉलिवूड कलाकारांची श्रद्धांजली

धक्कादायक...

पुढील बातमी
इतर बातम्या