अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू राॅय यांची गोळी झाडून आत्महत्या

महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू राॅय यांनी शुक्रवारी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली.

अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू राॅय यांची गोळी झाडून आत्महत्या
SHARES

महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अाणि १९८८ च्या बॅचचे अायपीएस अधिकारी हिमांशू राॅय यांनी शुक्रवारी आपल्या चर्चगेट येथील सुरूची या शासकीय इमारतीतील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांना त्वरीत बॉम्बे हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं. पण त्याआधीच त्यांना मृत्यू झाला. हिमांशू राय यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. हिमांशू राॅय यांच्या पार्थिवावर अाज रात्री १० वाजता मरीन लाइन्स इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत. 


सर्व्हिस रिवाॅल्व्हरने गोळी झाडली

राॅय हे गेल्या काही दिवसांपासून एका कर्करोगासारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त होते. या आजाराला कंटाळून त्यांनी शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास आपल्या राहत्या घरी अापल्याकडील सर्व्हिस रिवाॅल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. राॅय यांनी तोंडात गोळी झाडली आणि ही गोळी थेट डोक्यातून बाहेर आली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा मृतदेह बाॅम्बे हाॅस्पीटलमध्ये आणण्यात आला असून तिथं पोलिस अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पोलीस अायुक्त दत्ता पडसळगीकर अाणि सह पोलीस अायुक्त देवेन भारती हे बाॅम्बे हाॅस्पीटलमध्ये दाखल झाले अाहेत. त्यांचा मृतदेह अाता जेजे रुग्णालयात नेण्यात येणार अाहे. 


कोण होते हिमांशू रॉय?

  • हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. चार वर्ष त्यांनी मुंबई क्राईम ब्रांचमध्ये काम केलं होतं. तर एटीएएस प्रमुख म्हणून ते अधिक चर्चेत आले.
  • हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणं हाताळली. यात जेडे हत्याप्रकरण, आयपीएल सट्टेबाजी प्रकरणांचा समावेश होता.
  • दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासलं. त्यामुळे ते वैद्यकीय रजेवर होते. आजारपणामुळेच त्यांनी आयुष्य संपवलं असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु शवविच्छेदन अहवालातूनच खरं कारण समोर येईल.
  • हिमांशू रॉय यांनी २०१३ मधील आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणात अनेकांना अटक केली होती. त्यांनीच विंदू दारासिंहला बेड्या ठोकल्या होत्या.

हेही वाचा -

हिमांशु रॉय आत्महत्या : राजकीय नेतेमंडळी, बॉलिवूड कलाकारांची श्रद्धांजली

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा