चारित्र्याच्या संशयावरून भांडुपमध्ये पत्नीची हत्या

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या केल्याची घटना बुधवारी भांडुपमध्ये घडली. हत्येनंतर पतीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. भांडुप परिसरातील ४८ तासांतील ही दुसरी हत्या अाहे. 

दोरीने गळा आवळला

भांडुपच्या हनुमाननगर परिसरात आरोपी राहुल उर्फ अमर मयुरे हा पत्नी शिवानी (१९) सह राहत होता. मागील अनेक दिवसांपासून शिवानी वारंवार मोबाइलवर असायची. मयुरने तिला विचारल्यास मैत्रिणीचा फोन असल्याचे सांगून ती वेळ मारून न्यायची. बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास शिवानीला एक फोन आला. मयुरने तिला कोणाचा फोन अाहे असे विचारलं असता तिने मैत्रिणीचा फोन असल्याचं सांगितलं. पण तो एका पुरूषाचा फोन असल्याचं उघड झाल्यानंतर चिडलेल्या मयुरने कपडे वाळत घालण्याच्या दोरीने गळा आवळला. यात शिवानीचा जागीच मृत्यू झाला. 

मृतदेह घरातच ठेवला

पत्नीच्या हत्येनंतर मृतदेह तसाच ठेऊन मयूर घराला कुलूप लावून संपूर्ण दिवसभर कांजूरमार्ग परिसरात फिरत होता. शेवटी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पार्क साईट पोलिस ठाण्यात जाऊन त्याने हत्येची कबुली दिली. पार्कसाईट पोलिसांनी त्याला भांडुप पोलिसांच्या स्वाधीन केले. भांडुप पोलिसांनी शिवानीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. 


हेही वाचा - 

कमला मिल आग: पब मालकांचा जामीन अर्ज फेटाळला

'हिना’, ‘विकी’ मुंबई पोलिस दलातून सेवानिवृत्त


पुढील बातमी
इतर बातम्या