कमला मिल आग: पब मालकांचा जामीन अर्ज फेटाळला

कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या मोजोस बिस्ट्रो आणि वन अबोव्ह या दोन्ही पब मालकांचे जामीन अर्ज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावले.

कमला मिल आग: पब मालकांचा जामीन अर्ज फेटाळला
SHARES

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या मोजोस बिस्ट्रो आणि वन अबोव्ह या दोन्ही पब मालकांचे जामीन अर्ज गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते.


कुणाचा अर्ज?

आगीच्या घटनेनंतर जानेवारी २०१८ मध्ये मोजोस बिस्ट्रोचा मालक युग पाठक आणि वन अबोव्हचे मालक कृपेश संघवी, जीगर संघवी आणि अभिजीत मानकर यांना अटक करण्यात आली होती. सध्या हे चारही जण न्यायालयीन कोठडीत आहेत. या चार जणांचा जामीन अर्ज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी फेटाळून लावला.


आरोपपत्र दाखल

फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी या चौघांसोबत कमला मिल कंपाऊंडचे मालक, मुंबई महापालिका अधिकारी इ. १२ आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. त्याच्यावर हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरणे, दुसऱ्यांचे प्राण संकटात टाकून गंभीर दुखापतीला जबाबदार असल्याचे विविध कलम लावण्यात आले आहेत.


'यांना' जामीन

एप्रिलमध्ये देखील उच्च न्यायालयाने मोजोस बिस्ट्रोचा सह मालक युग तुली याचा जामीन अर्ज फेटाळला होता. तर मे महिन्यात न्यायालयाने कमला मिल कंपाऊंडचे मालक रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांना जामीद दिला होता. पब मालकांच्या गैरकारभारासाठी या दोघांना जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही, असं यावेळी न्यायालयाने म्हटलं होतं.



हेही वाचा-

कमला मिल आग : चौकशी समितीच्या अहवालास मुदतवाढ

कमला मिल आग दुर्घटना: चौकशी समितीवर १८ लाखांचा खर्च



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा