कमला मिल आग : चौकशी समितीच्या अहवालास मुदतवाढ

कमला मिल कम्पाऊंडमधील एका हाॅटेलला २९ डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. या आगीप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी जुलिओ रिबेरो यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

SHARE

कमला मिल आगीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल ३१ आॅगस्टपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात सादर होणं अपेक्षित होतं. मात्र, अाता न्यायालयानं अहवाल सादर करण्यासाठी चौकशी समितीला १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.


आगीप्रकरणी जनहित याचिका

कमला मिल कम्पाऊंडमधील एका हाॅटेलला २९ डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. या आगीप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी जुलिओ रिबेरो यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं एप्रिलमध्ये माजी मुख्य न्यायमूर्ती ए. व्ही. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली. ही समिती आगीची सखोल चौकशी करणार आहेच, पण त्याचबरोबर रेस्टाॅरंट आणि हाॅटेलमध्ये आगीच्या घटना घडू नयेत यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासंबंधीच्या शिफारशी करणार आहे.


सुनावणी १७ सप्टेंबरला

 या समितीकडून एप्रिलपासूनच कामाला सुरूवात झाली असून ३१ आॅगस्टपर्यंत समितीकडून यासंबंधीचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार होता. पण आता हा अहवाल सादर करण्यास न्यायालयानं समितीला १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर या याचिकेवरील पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला होणार आहे. हेही वाचा -

महापालिका करणार १३६ वर्षे जुन्या मलाबार हिल जलाशयाची दुरूस्ती

आयडॉलच्या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
संबंधित विषय
ताज्या बातम्या