Advertisement

आयडॉलच्या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


आयडॉलच्या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या 'दूर व मुक्त अध्ययन संस्था' (आयडॉल) २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत विलंब शुल्काशिवाय अर्ज करता येणार आहेत.


२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश

ही मुदतवाढ पदवीस्तरावरील बी.ए., बी.कॉम, बी.एससी. (आयटी), बी.एससी. (कम्प्युटर सायन्स), एम.ए., एम.ए. (एज्युकेशन), एम.कॉम., एम.एससी. (गणित, आयटी, कम्प्युटर सायन्स), द्वितीय व तृतीय वर्ष एमसीए, पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमांसाठी देण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त २७ हजार विद्यार्थ्यांचे 'आयडॉल'मध्ये प्रवेश झाले असून या मुदतवाढीमुळे आणखी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.


कल्याण उपकेंद्रात सुविधा सुरू

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा गांधारी येथील विद्यापीठाच्या उपकेंद्रात 'आयडॉल'चं केंद्र सुरू झालं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सध्या अध्ययन साहित्य देण्याची सुविधा सुरू केली असून इतरही सुविधा लवकरच सुरू करण्यात येतील. यामुळे डोंबिवलीपासून ते कर्जत, कसारा तसेच भिवंडी येथील विद्यार्थ्यांना कल्याण उपकेंद्रातून आयडॉलच्या सुविधा मिळणार आहेत.



हेही वाचा-

आयडॉल प्रवेशाचा गोंधळ सुरूच

१७ नंबरचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा