Advertisement

आयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार


आयडॉलच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल) मधील पदवी प्रवेशप्रक्रियेला यंदा विद्यार्थ्यांकडून खूप कमी प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत अवघ्या २५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलं असून तांत्रिक अडचणींमुळ विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. या अडचणीमुळे प्रवेशाची मुदत संपण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना आयडॉलच्या प्रवेशप्रक्रियेला १५ किंवा २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.


प्रतिसाद कमी

बीए, बी. कॉम, बीएससी (आयटी), बीएससी (कम्प्युटर सायन्स) या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया १२ जुलैपासून सुरू असून विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने प्रवेशाला कमी प्रतिसाद मिळाला असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.


प्रवेशाची मुदत वाढवण्याचा विचार

गेल्या वर्षी ऑयडॉलमध्ये ६८ हजार ५६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यामध्ये मुलांची संख्या २७ हजार १३६ तर मुलींची संख्या ४१ हजार ४३२ होती. मात्र, यंदा अर्ज भरण्यास तीन दिवस शिल्लक राहिले असतानाही केवळ २५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आयडॉलमध्ये प्रवेश घेता यावा यासाठी प्रवेशाची मुदत वाढवण्याचा विचार आयडॉल प्रशासन करत आहे.


हेही वाचा -

आयडॉलचा कोणताही अभ्यासक्रम रद्द नाही- यूजीसी

संबंधित विषय