१७ नंबरचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

काही कारणास्त्व या कालावधीत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षण विभागानं १० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट काढून ११ सप्टेंबरपर्यंत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या शाळा, काॅलेजांमध्ये जमा करण्याच्या सूचना शिक्षण मंडळानं दिल्या आहेत.

SHARE

नापास झालेल्या किंवा काही कारणास्त्व नियमित शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरण्यासाठी २५ ऑगस्ट ही मुदत देण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळानं १० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं खासगीरित्या अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. यामुो अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


आॅनलाइन अर्ज अनिवार्य

महाराष्ट्रात दरवर्षी दहावी आणि बारावी मिळून सुमारे १ ते २ लाख विद्यार्थी १७ क्रमांकाचा फॉर्म भरून परीक्षा देतात. यामध्ये प्रामुख्यानं नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार्थी आणि काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरणं अनिर्वाय राहणार असून फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. हा अर्ज स्वीकारण्याची तारीख ३० जुलै ते २५ ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती.


शिक्षण मंडळाची सूचना

मात्र काही कारणास्त्व या कालावधीत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षण विभागानं १० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट काढून ११ सप्टेंबरपर्यंत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या शाळा, काॅलेजांमध्ये जमा करण्याच्या सूचना शिक्षण मंडळानं दिल्या आहेत.


'अशा' पद्धतीनं भरता येईल अर्ज

दहावीच्या परीक्षेकरिता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना http://form17.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर, तर बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना http://form17.mh-hsc.ac.inया वेबसाईटवर अर्ज भरता येणार आहे.


अर्ज भरताना विद्यार्थ्यांसाठी काही सूचना:

  • अर्ज भरण्यासाठी वेबसाईटवर मराठी आणि इंग्रजीमधून सूचना दिल्या आहेत. त्या वाचल्यानंतरच विद्यार्थ्यांना अर्ज भरावा.
  • अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत (नसल्यास द्वितीय प्रत), आधारकार्ड, पासपोर्ट आकारातील फोटो ही कागदपत्र असणं आवश्यक आहे.
  • अर्ज भरण्याआधी विद्यार्थ्यांना ही कागदपत्रं स्कॅन करून ठेवा. अर्ज भरण्याच्यावेळी ही कागदपत्रं अपलोड करावी.
  • तसंच अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अनिर्वाय असणार आहे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर त्याची संपूर्ण प्रत विद्यार्थ्यांना ई-मेलवर पाठवण्यात येणार आहे.
  • अर्जाची ही प्रत पाठवल्यानंतर त्याची प्रिंट आऊट, शुल्क पावती, व हमीप्रताची दोन प्रत काढून त्यासह इतर कागदपत्र विद्यार्थ्यांना संबंधित शाळा व महाविद्यालयात मुदतीपूर्व भरावी लागणार आहे.
  • तसंच अर्ज भरताना अडचणी आल्यास ०२०-२५७०५२०८ / २५६७६४०५ / २५७०५२७१
    या दूरध्वनी क्रमांकावर कार्यकालीन वेळेदरम्यान संपर्क साधता येणार आहे.हेही वाचा-

अकरावी प्रवेश: 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीसाठी ७६ हजार जागा

आयटीआयला विद्यार्थ्यांची वाढती पसंतीसंबंधित विषय
ताज्या बातम्या