Advertisement

महापालिका करणार १३६ वर्षे जुन्या मलाबार हिल जलाशयाची दुरूस्ती

सद्यस्थितीत मलबार हिल जलाशयातून दक्षिण मुंबई परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. यामध्ये ए (फोर्ट), सी (गिरगाव) आणि डी (मलाबार हिल) या वाॅर्डांचा समावेश आहे. हे १३६ वर्षे जुनं जलाशय हँगिंग गार्डनच्या बरोबर खाली आहे.

महापालिका करणार १३६ वर्षे जुन्या मलाबार हिल जलाशयाची दुरूस्ती
SHARES

तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, पण मुंबई महापालिकेने चक्क मुंबईत जलाशय बांधण्याची तयारी सुरू केली आहे. हे नवं जलाशय जुन्या जलाशयाचा भार कमी करण्यासाठी बांधण्यात येणार आहे. मुंबईत मलबार हिल इथं तब्बल १३६ वर्षे जुनं जलाशय आहे. या जलाशयाला तातडीच्या दुरूस्तीची गरज अाहे. त्यामुळे जुन्या जलाशयाच्या दुरूस्तीसोबतच नवं जलाशय बांधण्यात येणार आहे. नव्या जलाशयामुळे परिसरातील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकेल.


कुठं आहे जुनं जलाशय?

सद्यस्थितीत मलबार हिल जलाशयातून दक्षिण मुंबई परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. यामध्ये ए (फोर्ट), सी (गिरगाव) आणि डी (मलबार हिल) या वाॅर्डांचा समावेश आहे. हे १३६ वर्षे जुनं जलाशय हँगिंग गार्डनच्या बरोबर खाली आहे.


किती क्षमता?

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, नव्या जलाशयाची पाणी साठवण्याची क्षमता जुन्या जलाशयाच्या तुलनेत २० पट अधिक असेल. जुन्या मलबार हिल जलाशयाची पाणी साठवण्याची क्षमता १४७ दशलक्ष लिटर एवढी आहे. या जलाशयाच्या ५ भागांची दुरूस्ती करण्यात येणार आहे.


नवीन जलाशय

जुन्या जलाशयातील ५ भागांची दुरूस्ती करण्यासाठी ते बंद ठेवण्यात येतील. त्या कालावधीत नवीन जलाशयातून परिसरात पाणीपुरवठा करण्यात येईल. यामुळे दक्षिण मुंबईतील रहिवाशांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही. नवीन जलाशयाचं बांधकाम पुढील ३ ते ४ महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे.हेही वाचा-

जुन्याच कचरा कंत्राटदारांना मुदतवाढ; महापालिकेवर नामुष्की

मुंबईतील २२३ गणेशोत्सव मंडळांचे अर्ज नाकारले!Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा