'हिना’, ‘विकी’ मुंबई पोलिस दलातून सेवानिवृत्त

मुंबई पोलिस दलातील 'हिना' आणि 'विकी' हे श्वान बुधवारी निवृत्त झाले. वयाच्या दुसऱ्या महिन्यापासूनच ते पोलिस दलात कर्तव्य बजावत होते. २००८ मध्ये जन्मलेल्या हिना आणि विकीला वयाच्या दुसऱ्या महिन्यातच पोलिस दलात समाविष्ठ करून घेण्यात आलं होतं. त्यानंतर सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठवण्यात आलं.

SHARE

अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यात आपली महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांना आरोपींपर्यंत पोहचवणारे मुंबई पोलिस दलातील 'हिना' आणि 'विकी' हे श्वान बुधवारी निवृत्त झाले. वयाच्या दुसऱ्या महिन्यापासूनच ते पोलिस दलात कर्तव्य बजावत होते.

२००८ मध्ये जन्मलेल्या हिना आणि विकीला वयाच्या दुसऱ्या महिन्यातच पोलिस दलात समाविष्ठ करून घेण्यात आलं होतं. त्यानंतर सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठवण्यात आलं.


आरोपींचा मिनिटात लावला शोध

मागील दहा वर्षांत या दोघांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करत पोलिसांना त्यांच्या कर्तव्यात यशस्वीरित्या मदत केली. नुकतीच हिनाने भोईवाडा परिसरातील एका हत्येच्या गुन्ह्याचा बखुबी छडा लावला होता. नुसत्या एका कापडाच्या वासावर तिने आरोपीचं घर शोधून काढण्यात पोलिसांना मदत केली होती. तर विकीची कामगिरी कौतुकास्पदच होती.


दहा वर्षानंतर निवृत्ती

बुधवारी तब्बल दहा वर्षांच्या सेवेनंतर या दोन्ही श्वानांना मुंबईचे पोलिस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी सन्मानाने निवृत्ती दिली. आझाद मैदान पोलिस क्लब येथे निवृत्तीच्या वेळी हिनाचे हँडलर्स उमेश चापटे, विकास शेंडगे आणि विकीचे हँडलर्स बाळासाहेब चव्हाण आणि दीपक देशमुख हेही उपस्थित होते.हेही वाचा - 

१९ ते ३० नोव्हेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन, केवळ ९ दिवस चालणार कामकाज

भारतातून ६०० महिलांना परदेशातल्या वेश्या व्यवसायात ढकललं
संबंधित विषय
ताज्या बातम्या