Advertisement

१९ ते ३० नोव्हेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन, केवळ ९ दिवस चालणार कामकाज

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक गुरुवारी सकाळी पार पडली. यावेळी हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार १९ ते३० नोव्हेंबरदरम्यान पार पडणाऱ्या या अधिवेशनात कामकाजासाठी केवळ ९ दिवस मिळणार आहे. दुष्काळ आणि शेतकऱ्याच्या प्रश्नांसारखे अनेक प्रश्न असताना कामकाजासाठी कमी दिवस मिळत आहेत. त्यामुळे कामकाजाचा वेळ वाढण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

१९ ते ३० नोव्हेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन, केवळ ९ दिवस चालणार कामकाज
SHARES

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन १९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मुंबईत पार पडणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक गुरुवारी सकाळी पार पडली. यावेळी हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली.

त्यानुसार १९ ते३० नोव्हेंबरदरम्यान पार पडणाऱ्या या अधिवेशनात कामकाजासाठी केवळ ९ दिवस मिळणार आहे. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, दुष्काळ आणि शेतकऱ्याच्या प्रश्नांसारखे अनेक प्रश्न असताना कामकाजासाठी कमी दिवस मिळत आहेत. त्यामुळे कामकाजाचा वेळ वाढण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.


मुंबईत होणार अधिवेशन

मनोरा आमदार निवासाच बांधकाम, मेट्रोच्या कामामुळं होणारी वाहतूक कोंडी आणि पावसामूळ बंद पडणारी मुंबई या बाबी लक्षात घेता सत्ताधाऱ्यांनी यंदा ४७ वर्षानंतर पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपुरात घेतलं. तर आता गेल्या कित्येक वर्षांपासून नागपुरात होणार हिवाळी अधिवेशन आता मुंबईत होणार आहे.


तारीख जाहीर

गुरुवारी या अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अधिवेशन पार पडणार आहे. केवळ दोन आठवडेच अधिवेशन चालणार असून कामकाजासाठी फक्त ९ दिवस मिळणार आहेत. गुरुनानक जयंती दिनी ही कामकाज चालणार असलं तरी कमी वेळ मिळणार आहेत. त्यामुळे आता विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची मागणी केली आहे.



हेही वाचा - 

मंत्रीमंडळ विस्तार लांबला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा